शिराळा (जी.जी.पाटील)
मणदूर (ता.शिराळा) येथील अशोक विष्णु सोनार या शेतकऱ्यावर रानगव्याचा प्राणघातक हल्ला केला असुन गंभीर जखमी झाले.
चांदोली राष्ट्रीय उद्याना लगत असणार्या गावांमध्ये जंगली प्राण्यांचे शेतकरी, लहान मुले आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होतं असून उदगिरी, शित्तूर – वारुण, आरळा, उखळू, सोनवडे त्याचबरोबर मणदूर या गावात आणि परिसरात अभयारण्यातील प्राणी शेतीचे, पशुधनाचे नुकसान करत असून मानवावरील हल्ल्याचे सत्र चालूच आहे. आज सकाळी सात वाजता मणदूर येथील शेतकरी अशोक विष्णू सोनार वय ( 60 वर्ष ) आपल्या शेताकडे गेले असता यांचेवर गव्याने हल्ला केला.वारणा डाव्या कालव्याजवळील काळंबा मंदिर शेजारी ही घटना घडली.
परिसरात आरडाओरड झाल्याने शेतकरी जमा झाले त्यानी अशोक सोनार याना मणदूर च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा साठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच चांदोली राष्ट्रीय उद्यानातील वनपाल हारूण गारदी घटनास्थळावर दाखल झाले.व घटनेची माहिती घेतली. सदरच्या घटनेने पुन्हा एकदा परिसरातील लोकमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सदर जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतं आहे.
![]() |
![]() |