WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

‘सेवा ही स्वच्छता सप्ताह’ अभियानांतर्गत शिवाजी विद्यापीठामध्ये स्वच्छता मोहीम

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर,: महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे ‘सेवा ही स्वच्छता सप्ताह’ अभियानांतर्गत आज सकाळी स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्यात आली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ विद्यापीठ परिसरच नव्हे, तर विद्यापीठ परिसराबाहेरील सायबर चौकापर्यंतचा परिसर या मोहिमेअंतर्गत स्वच्छ करण्यात आला.

दरर्षीप्रमाणे शिवाजी विद्यापीठातर्फे गेल्या पंधरवड्यापासूनच विभाग व अधिविभागांत अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने सर्वच घटकांना स्वच्छता करावयाचा परिसर नेमून देण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक अधिविभागातील शिक्षक, विद्यार्थ्यांसह प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी त्या त्या परिसराची स्वच्छता केली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या ५००हून अधिक स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विद्यापीठाचे प्रवेशद्वार क्रमांक एकपासून ते सायबर चौकापर्यंतचा कम्पाऊंड भिंतीलगतचा संपूर्ण परिसर कचरा व प्लास्टीकपासून मुक्त केला. फूटपाथ व भिंतीच्या दरम्यान उगवलेली झुडपे काढून तेथीलही स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेमध्ये कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनीही मोहिमेत पूर्णवेळ सहभाग घेऊन स्वच्छता मोहिमेत राबणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या परिसरामधून प्लास्टीकच्या पिशव्या, पोती, ओला व सुका कचरा, प्लास्टीक व काचेच्या बाटल्या यांच्यासह रस्त्याकडेला उगवलेली काटेरी झुडपे व अन्य कचरा

oplus_1048576मोठ्या प्रमाणावर गोळा करण्यात आला.

oplus_1048576

तत्पूर्वी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करीत विद्यापीठ परिसरातून डॉ. आप्पासाहेब पवार चौकापर्यंत सहा नंबर प्रवेशद्वारामार्गे प्रभात फेरी काढली. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’, ‘स्वच्छता ही सेवा’ अशा अनेकविध घोषणा यावेळी दिल्या.

विद्यापीठात रुजलाय स्वच्छतेचा संस्कार

विद्यापीठामधील स्वच्छता मोहिमेदरम्यान प्लास्टीक कचऱ्याचे प्रमाण नगण्य आढळून आले. विद्यापीठात सर्वच घटकांत स्वच्छतेचा संस्कार रुजल्याची प्रचिती त्यातून आली. विद्यार्थ्यांसह अभ्यागत हे कचरा संकलनासाठी ठिकठिकाणी ठेवलेल्या कुंड्यांचा वापर करीत असल्याने आणि त्याची योग्य प्रकारे निर्गत केली जात असल्याने हे शक्य झाले. विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांनी यापुढील काळातही आपला विद्यापीठ परिसर असाच स्वच्छ आणि विशेषतः प्लास्टीकमुक्त राहण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.