स्केटिंग क्षेत्रातील उल्लेखनीय बद्दल गौरव…
कोल्हापूर – स्केटिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि स्केटिंग खेळावर प्रथमच शारीरिक शिक्षण विषयातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) या ठिकाणी भारतातील पहिली पी. एच. डी केल्याबद्दल आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर विश्रामगृह या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री. शंभूराजे देसाई यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉक्टर महेश अभिमन्यू कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माननीय शिवराज देसाई ही उपस्थित होते.
यावेळी मंत्री महोदयांनी स्केटिंग खेळाविषयी सर्व माहिती आणि महेश कदम हे अमेरिका येथील आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती घेतली. मंत्री देसाई यांनी महेश कदम यांच्या या कार्याची खूप प्रशंशा केली. आणि महाराष्ट्र राज्य शासनाकडून स्केटिंग खेळाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतले श्रीअंबाबाईचे दर्शन…
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.













































































