WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये ‘चाईल्ड फ्रेंडली’ अत्याधुनिक बालरोग विभागाचा शुभारंभ

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

वैजयंती संजय पाटील व वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…

कोल्हापूर – डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा ‘चाईल्ड फ्रेंडली’ प्रशस्त बालरोग विभागाचा शुभारंभ करण्यात आला. १०० बेडच्या या अत्याधुनिक बालरोग विभागाचे उद्घाटन विश्वस्त सौ. वैजयंती संजय पाटील आणि अॅडव्हायझर सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या २० वर्षांपासून डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना मोफत अथवा अत्यंत माफक दरात दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच संकल्पनेतून हा प्रशस्त बालरोग विभाग साकार झाला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांनी यावेळी दिली.

या विभागात ६० बेडचा जनरल शिशु विभाग, ३० बेडचा नवजात शिशु विभाग तर १० बेडचा लहान मुलांसाठीचा अतिदक्षता विभाग उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी डे- केअर सुविधाही सुरु करण्यात आली आहे. या ठिकाणी अत्याधुनिक व्हेंटीलेटर्स, लेव्हल 3 प्रीमॅच्युअर बेबी केअर, मेंदू , पोट, किडनी, मुलांचे हाडाचे आजार इत्यादीवर विविध शस्त्रक्रिया, एमआरआय, सिटी स्कॅन अशा सुविधा अत्यंत माफक खर्चात उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे बालरोग विभागप्रमुख डॉ. निवेदिता पाटील यांनी सांगितले.

उपचारासाठी येणाऱ्या मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी दोन कक्ष उभारण्यात आले आहे. विभागातील भिंती, वातावरण बालकांच्या भावजीवनाशी सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पालकांच्या समुपदेशानाची सेवाही देण्यात आली आहे. या बाल रोग विभागामध्ये अनुभवी व तज्ञ २७ डॉक्टर्स आणि २२ परिचारिका व सहाय्यक सेवेसाठी कार्यरत आहेत.

या अत्याधुनिक बालरोग विभागाच्या उद्घाटन सोहळ्याला कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, बालरोग विभागाच्या डॉ. मोहन पाटील, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. रमेश निगडे, डॉ. साईप्रसाद कवळेकर, डॉ. देवयानी कुलकर्णी, डॉ. प्रीती नाईक, डॉ. श्रद्धा कुलकर्णी, डॉ. अर्चना पवार, डॉ. रवींद्र पवार, डॉ. विलास जाधव, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे, प्रा. सदानंद सबनीस, केतन जावडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.