शित्तूर – वारुण ( तालुका – शाहूवाडी ) येथील एम. डी. राऊत आणि मालाईवाडा येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले तानाजी रामचंद्र वाघमोडे या गुरु – शिष्यांचा एकाच व्यासपीठावर शिक्षण भूषण पुरस्काराने सन्मान होणार आहे. शित्तूर – वारुण येथील वारणा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. डी. राऊत आणि त्यांचे सन 1996 सालच्या एस. एस. सी. बॅच चे विध्यार्थी ,सध्या येळवन जुगाई येथील मालाईवाडा प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले विषय शिक्षक तानाजी रामचंद्र वाघमोडे (राघूवाडा) शित्तूर वारुन यांना’ डॉक्टर विनय कोरे गौरव प्रतिष्ठान ‘वारणानगर मार्फत, देण्यात येणारा डॉक्टर विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्कार 2021-2022 घोषित झाला आहे.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ कॅम्पस वारणानगर येथील विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक विकास केंद्र वारणा नगर येथे हाेणार आहे. यावेळी सुक्ष्म, लघु आणि उद्योग मंत्रालयाचे नारायण राणे यांची प्रमुख उपस्तितीत राहणार आहे.
गुरु-शिष्य येणार एकत्र..स्विकारणार सन्मान
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.