कैलासवासी सुनंदा डवर फाउंडेशन च्यावतीने शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप…
राधानगरी – कैलासवासी सुनंदा डवर फाउंडेशन यांच्यावतीने आणि आमदार प्रेमी ग्रुप यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राधानगरी तालुक्यातील विद्यामंदिर फराळे, विद्या मंदिर डवरवाडी, विद्या मंदिर पाठ पन्हाळा, विद्यामंदिर पाठपन्हाळा धनगरवाडा, विद्या मंदिर लिंगाची वाडी, विद्यामंदिर काळम्मावाडी, विद्या मंदिर राजापूर, विद्यामंदिर धाऊरवाडा, विद्या मंदिर दूधगंगानगर येथील शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.
फाउंडेशन च्यावतीने दरवर्षी विविध माध्यमातून कार्यक्रम राबवले जातात. यावेळी विलास डवर, लक्ष्मण गिरी, सुरेश पाटील, तुकाराम सावंत, आनंदा पाटील, विष्णू राम डवर, ओंकार डवर, गोविंदा पाटील, राजू सुतार, शांताराम चौगुले, उत्तम तळेकर, नामदेव वासकर, नंदकुमार पाटील, प्रवीण पाटील, विनोद डवर, तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.