संतोष सं. भोसले, यांची कोकण विभागाच्या
अपर कामगार आयुक्त पदी पदोन्नत
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असेलेल्या कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त पदी संतोष सं. भोसले, कामगार उप आयुक्त यांची अपर कामगार आयुक्त पदी पदोन्नती करण्यात आलेली आहे. संतोष सं. भोसले, यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 1996 मध्ये सरकारी कामगार अधिकारी पदी निवड करण्यात आली होती. ते सुमारे 28 वर्षापासून कामगार विभागात कार्यरत आहेत. त्यांनी कामगार विभागातील विविध महत्वाची पदे भुषवलेली आहे. त्यांची पुणे प्रशासकीय विभागामध्ये जास्तीत-जास्त सेवा झालेली आहे.
अनेक आस्थापनांमध्ये औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्यात ते यशस्वी राहीलेले आहेत. संतोष सं. भोसले, यांची कामगार विभागाचे कामगार कायद्यांचे सखोल ज्ञान असलेले कार्यतत्पर अधिकारी म्हणुन ओळख आहे.