WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

काेल्हापूर-६९ दिंड्या सज्ज पंढरीच्या वारी… जबाबदारीही ठरली शासनाची… केले असे नियाेजन आराेग्यवारीचे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

आरोग्याची वारी पंढरीच्या दारी व आरोग्य विषयक दुरचित्रवाहीनीचे

मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते उदघाटन

* जिल्ह्यातुन 69 दिंड्या जाणार

* आरोग्य विभागामार्फत सुसज्ज अॅब्युलन्ससह 2 आरोग्य पथक व 15 आरोग्य दुतांमार्फत आरोग्य सेवा देणार

कोल्हापूर : आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अंतर्गत शासनामार्फत श्री क्षेत्र पंढरपुरकडे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरुन लाखोच्या संख्येने वारकरी येत असतात. याकरिता शासनाने जिल्ह्यातुन जाणाऱ्या व जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या दिंड्याना आरोग्य पथकाद्वारे उपचार व सेवा देण्यासाठी विशेष बाब म्हणुन प्रत्येक दिंडीला आरोग्य दुतामार्फत आरोग्य सेवा देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या दिंडीला जिल्हा परिषद मुख्यालय कोल्हापूर येथुन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, उपसंचालक, आरोग्य सेवा डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत आरोग्याची वारी पंढरीच्या दारी व आरोग्य विषयक दुरचित्रवाहीनीचे जिल्हा परिषद मुख्यालय आवारात  उदघाटन करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यातुन 69 दिंड्या जाणार आहेत. त्यापैकी मुख्य दिंडी कसबा सांगाव येथुन दि. 8 जुलै 2024 रोजी जाणार आहे. ही दिंडी जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यातुन मुक्काम करत पुढे जाणार आहे तसेच इतर दिंडीचा मार्ग हा कोल्हापूर ते पंढरपुरकडील मुख्य मार्गावरील गावातून जाणारा आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुसज्ज अॅब्युलन्ससह 2 आरोग्य पथक व 15 आरोग्य दुतांमार्फत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.

 *आरोग्य पथकामार्फत देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा अशी-*

आरोग्य पथकाची स्थापना, पथकामध्ये 1 समुदाय आरोग्य अधिकारी, 1 औषध निर्माण अधिकारी, 1 आरोग्य सेवक व 1 वाहन चालक (अॅब्युलन्स सह) असे आहे. पथकातील अॅब्युलन्समध्ये सुसज्ज औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. आरोग्य पथक क्रं. 1 कोल्हापूर, पुणे, आळंदी मार्गे ते पंढरपुर या मार्गावर आरोग्य सेवा देणार आहे. आरोग्य पथक क्रं. 2 कसबा सांगाव, नृसिंहवाडी, सांगोला मार्गे ते पंढरपुर मार्गावर आरोग्य सेवा देणार आहे.

*आरोग्य दूत मार्फत देण्यात येणाऱ्यासेवा *

जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य दूतास प्रथमोपचार औषध किट, ड्रेसकोडसहीत ओळखपत्र देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकुण 69 दिंड्याची नोंद झालेली असून प्रत्येक दिंडीसोबत आरोग्य दूतामार्फत आरोग्य सेवा व प्रथमोपचार देण्यात येणार आहे. आरोग्य दूत हे कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंत दिंडीस आरोग्य सेवा पुरविणार आहेत व पुढील जिल्ह्यात त्या जिल्ह्याचे आरोग्य दूत दिंडीसोबत राहणार आहेत. वारकऱ्यांना शुध्द पिण्याचे पाणी पिण्याबाबत व उघड्यावरचे अन्न पदार्थांबाबत आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांची जनतेमध्ये प्रसार व प्रसिध्दी करण्यासाठी दुरचित्रवाहिनीचे संच उपलब्ध करुन देण्यात आले असून आरोग्य विभागाच्या नाविन्यपुर्ण योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पाहेचवणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. आरोग्य विभाग जिल्हा परिषदेच्या मुख्यालय आवारामध्ये आरोग्य विषयक दूरचित्रवाहिनी संच बसविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.