प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जनजागृती सुरू…
कोल्हापूर – रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत प्रारंभी शासकीय कर्मचाऱ्यांवर हेल्मेट सक्ती केली जात आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणाऱ्यावर थेट कारवाई करण्याच्या सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिल्या आहेत. त्यानुसार हेल्मेटच्या वापराबद्दलच्या प्रबोधनाला सुरुवात झालीय. तसच प्रादेशिक परिवहन कार्यालयात हेल्मेटविना प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई केली जातीय.
![]() |
![]() |
कोल्हापुरात दररोज वाहनांची संख्या वाढत आहे. परिणामी रहदारीतही वाढ होत आहे. तोकडे रस्ते, बेशिस्त वाहनधारक, वेग मर्यादांचे पालन न करणं या सारख्या कारणांमुळ अपघात होतात. दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नसल्यानं अपघातात अनेकांना प्राणाला मुकावा लागलंय. अनेक जण कायमचे जायबंदी झालेत. २०२२ या वर्षात जिल्ह्यात ७०१ अपघात झाले. त्यामध्ये २५० वाहन चालकांनी जीव गमवला. तर ४६४ जणांना अपंगत्व आलं. मार्च २०२३ अखेर ४३० अपघात झाले आहेत. त्यामध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०२ जणांना अपंगत्व आल. मृत्यू आणि कायमस्वरूपीच अपंगत्व टाळण्यासाठी शासनान हेल्मेट सक्तीचा कायदा केलाय. त्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जनजागृती सुरू आहे.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
हेल्मेट सक्ती केलीय हेल्मेटचा वापर करण्यासाठी नागरिकांच प्रबोधन केल जातय. तसंच अशा वाहनधारकांवर कारवाईला देखिल सुरवात झाली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या वाहनधारकांनी हेल्मेट परिधान केल नसेल तर त्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसंच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील सुरू आहे. गेल्या ३ दिवसांपासून या कार्यालयाकडून १३५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.














































































