प्रजासत्ताक दिना निमित्त दिल्ली येथे होणाऱ्या आरडीसी परेड साठी सांस्कृतिक विभागातून निवड…
कसबा बावडा – कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची छात्रा कु. सिद्धी राज्याध्यक्ष हिची एन.सी.सी. च्या 5 महाराष्ट्रीयन बटालियन मधून 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त दिल्ली येथे होणाऱ्या आरडीसी परेड साठी सांस्कृतिक विभागातून निवड झाली आहे.
या निवडीकरता गेले तीन महिने सिद्धी कोल्हापूर आणि पुणे येथील 10 हून अधिक शिबिरामध्ये सहभागी झाली होती. त्या सर्व सराव शिबिरातील खडतर निवड प्रक्रियेतून तिची या परेडसाठी निवड झाली आहे. तिला महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे एन. सी.सी. ऑफिसर (ए.एन.ओ.) डॉ.राहुल महाजन, प्रशिक्षक क्रांतिराज पाटील तसेच अधिष्ठाता डॉ. राहुल पाटील यांचे मार्गदर्शन व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी.चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल.व्ही.मालदे यांचे प्रोत्साहन लाभले.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के.गुप्ता यांनी सिद्धीचे अभिनंदन केले.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.














































































