यशवंत चंद्रकांत भोसले व श्रुती सचिन जोशी यांना महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान…
कसबा बावडा – बारावीचा ऑनलाईन निकाल गुरुवारी जाहीर झाला असून डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा विद्यार्थी यशवंत चंद्रकांत भोसले याने ९६ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
विज्ञान शाखेत स्वरणीका कराळे हिने याने ९२ टक्के गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला असून तिला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. प्रतिक पांडुरंग चव्हाण याने ८६.५० टक्के गुणासह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. याच शाखेत हर्षवर्धन कवठेकर, दीपश्री पाटील आणि मधुरा कदम या तिघांनी भूगर्भशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. वाणिज्य शाखेत श्रुती सचिन जोशी हिने ९५.८३ टक्के गुणासह प्रथम क्रमांक मिळवला असून तिला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. निनाद जोशी व मृणाल महाडेश्वर यांनी ९५.६७ टक्के गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला असून दोघानीही अकौंटन्सी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. अथर्व खटावकर याने ९४.८३ टक्के गुण मिळवत तृतीय स्थान मिळवले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, महाविद्यालयाचे सल्लागार अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.