WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅबचे उद्घाटन

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

केमिकल विभागच्या नव्या लॅबच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. संतोष चेडे, डॉ. के. टी. जाधव, प्रकाश बंडगर, डॉ. एल व्हि. मालदे, डॉ. अमरसिंग जाधव, डॉ. राहुल पाटील, प्रा. सुदर्शन सुतार, प्रा.मनीषा भानुसे

कोल्हापूर – येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या केमिकल अभियांत्रिकी विभागाचे आणि माजी विद्यार्थ्यानी ६७ लाखांची निधीतून उभारलेल्या ‘इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅब’चे उद्घाटन प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांच्या हस्ते झाले. माजी विद्यार्थ्यानी दिलेले योगदान महत्वपूर्ण असून नव्या विद्यार्थ्यांना ही लॅब अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉ. चेडे यांनी यावेळी व्यक्त केला.

महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या ‘इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब’साठी केमिकल विभागाच्या माजी संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या केमिकल रिएक्टर, प्लेट टाइप हिट एक्सचेंजर, डिस्टीलेशन सेट अप, रिऍक्टर साठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या पॅकिंग अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. त्यासाठी केमस्पेप्ट इंजिनिअरिंग प्रा. लि. पुणे चे प्रकाश बंडगर, एच.एक्स. इंडियाचे अभय कुलकर्णी आणि प्रफुल्ल वायफळकर, केम ऑर्बिटचे किरण पाटील, तसेच नरेश हंचाते, रोहित अंतुलवार, प्रवीण आयवळे, साईसागर खोत, ऑक्सिकेमचे शुभम पाटील यांनी योगदान दिले आहे. या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नूतनीकरण झालेल्या सर्व लॅब्स आणि रिसर्च लॅबचे उद्घाटन तसेच प्लेसमेंट ब्रोशर, टेक्निकल मॅगझिन आणि न्यूज लेटर्स यांचे प्रकाशन यावेळी झाले.

याप्रसंगी बोलताना केमसेप्ट इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड चे प्रकाश बंडगर म्हणाले, “केमिकल इंजिनिअरिंग ही अभियांत्रिकी महत्वपूर्ण शाखा आहे. केमिकल शाखेच्या अभियंत्यांसाठी भविष्यकाळ उज्ज्वल आणि देदिप्यमान आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांनी करिअरची दिशा ठरवून खडतर परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी. सर्व माजी विद्यार्थी यापुढेही महाविद्यालयासाठी आवश्यक ते सहकार्य करतील. माजी विद्यार्थ्यांनी ही लॅब उभारण्यासाठी घेतलेला पुढाकार, दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. याचा फायदा नव्या विद्यार्थ्यांना होईल. या माध्यमातून या विद्यार्थ्याचे समाज आणि देशांसाठी योगदान राहील. समस्त मानवजातीसाठी या केमिकल शाखेचे महत्वपूर्ण योगदान असेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे यांनी केले.

विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव म्हणाले, या विभागासाठी नूतन सात अद्ययावत लॅब्स, रिसर्च लॅब आणि नवीन इन्फ्रास्ट्रक्टरबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि व्यवस्थापनाचे अत्यंत आभारी आहोत. तसेच लॅब उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचेही मी आभार मानतो. उत्कृष्ट अध्यापन आणि संशोधन या माध्यमातून विभागाची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची घोडदौड सदैव चालू राहील.

सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहयोगी प्राध्यापक लेफ्टनंट डॉ. राहुल महाजन यांनी केले. या माजी विद्यार्थ्यांनी सदर रिसर्च लॅब संशोधनासाठी सुसज्ज करणेसाठी आवश्यक उपकरणे पुरविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील,विश्वस्त श्री. ऋतुराज पाटील, डॉ. ए. के. गुप्ता यांनी अभिनंदन केले आहे. उद्घाटन समारंभावेळी रजिस्ट्रार डॉ. एल व्हि. मालदे, अधिष्ठात डॉ. अमरसिंग जाधव, डॉ. राहुल पाटील, प्रा. सुदर्शन सुतार, सह अधिष्ठाता प्रा.मनीषा भानुसे, प्रा. रविंद्र बेन्नी, टिपीओ प्रा. मकरंद काईंगडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.