विनायक जितकर
इंडस्ट्रियल हेल्थ, सेफ्टी, प्रदूषण नियंत्रण या बाबतीत नवीन कल व अद्यावत तंत्रज्ञान
डॉ. प्रतापसिंह देसाई यांचे स्वागत करताना डॉ. ए. के. गुप्ता समवेत डॉ. एस. डी. चेडे, डॉ. एम. एम. नरके.
कसबा बावडा : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल विभागाच्यावतीने आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. ही कार्यशाळा इंडस्ट्रियल हेल्थ, सेफ्टी, प्रदूषण नियंत्रण या बाबतीत नवीन कल व अद्यावत तंत्रज्ञान यावर घेण्यात आली.
कार्यशाळे दरम्यान उद्योग विश्व, महाराष्ट्र सेफ्टी डिपार्टमेंट, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच नामांकित शिक्षण संस्था मधून अनुभवी, तज्ञ वक्त्यांनी 40 हून जास्त शिक्षक वर्गाला याबाबतीत प्रात्यक्षिका सहित मार्गदर्शन केले. सर्व सहभागी शिक्षकांसाठी सत्यम पेट्रोकेमिकल्स, उंब्रज येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या भेटी दरम्यान इंडस्ट्रियल सेफ्टी व हजार्ड याबाबतीत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
कार्यशाळेचा समारोप आय.एस.टी.ई. चे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, कौन्सिल मेंबर डॉ. एम. एम. नरके यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आला .यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य संतोष कुमार चेडे,विभागप्रमुख डॉ के टी जाधव, समन्वयक डॉ राहुल महाजन व विविध महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.
डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.