स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णाचे वाचवले प्राण…
म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका पवार यांनी गरोदर अवस्थेतही विष प्राशन केलेल्या तरुणाचे स्वतः अँम्बुलन्स चालवून प्राण वाचवले.
डॉक्टर प्रियंका पवार या मंगळवारी ड्युटीवर असताना सायंकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान मांजरगाव येथील २७ वर्षे युवकाने विष प्राशन केलेल्या अवस्थेत त्याला दाखल केले. डॉक्टर पवार यांनी रुग्णावर प्राथमिक उपचार केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णाला पुढील उपचाराची गरज होती.
प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका असून देखील त्याचा चालक रजेवर असल्याने रुग्णाला निफाड येथे उपचारासाठी नेणे गरजेचे होते परंतु डॉक्टर प्रियांका पवार या गरोदर अवस्थेत आहे त्यांनी मागचा पुढचा विचार न करता रात्री साडेआठ वाजता आरोग्य सेवक संसारे यांना सोबत घेऊन स्वतः रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर म्हणून स्टेरिंग हातात घेतले, रुग्णाचा जीव वाचवणे हाच महत्त्वाचा हेतू डोळ्यासमोर होता. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णाचे प्राण वाचवले.