डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजित उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. महादेव नरके
कोल्हापूर – कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास मार्गदर्शन उपक्रम झाला. कोल्हापूर आय. टी. असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, स्मॅकचे संचालक उद्योजक संजय भगत, क्रिडाईचे संचालक बांधकाम व्यवसायिक आदित्य बेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम झाला.
उद्योजक संजय भगत यांनी आत्मपरीक्षण, आत्मविश्वास या जोरावर योग्य नियोजन उद्योगात आवश्यक असल्याचे सांगितले. प्रताप पाटील यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी ज्या क्षेत्रात आवड आहे तिथे जास्तीत जास्त वेळ देऊन कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे नमूद केले. क्रीडाई संचालक आदित्य बेडेकर यांनी गुणवत्ता,कस्टमर रिलेशन आणि झोकून देवून काम करण्याची तयारी ठेवली तर यश निश्चित आहे असे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी उद्योग उभारताना येणाऱ्या अडचणी, उद्योग कसा निवडावा?, त्यासाठी भांडवल कसे उभारावे? बिझनेस मधील अपयश कसे पचवावे? उद्योजक होण्यासाठी कोणते गुण हवेत याबद्दल प्रश्न विचारले.
प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपप्राचार्य नितीन माळी,रजिस्ट्रार महेश रेणके, विभाग प्रमुख डॉ. पी. के. शिंदे, प्रा. शीतल साळोखे, प्रा. अक्षय करपे उपस्थित होते. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. अजय बंगडे यांनी आभार मानले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.