जिल्हा बँकेच्या तत्कालीन शाखाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल…
धुळे (गोपाल के.मारवाडी) – बनावट सह्या आणि अंगठ्यांच्या विड्रॉल स्लिप बनवून तब्बल ३१ लाखांची रक्कम हडप करणाऱ्या जिल्हा बँकेच्या दोंडाईचा शाखेच्या तत्कालीन शाखाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी जितेंद्र जयसिंग गिरासे (वय ३९ रा.विद्यानगर, दोंडाईचा, जि. धुळे) यांनी दोंडाईचा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, बँकेच्या दोंडाईचा शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी शिरीष मोतीलाल बाविस्कर (वय ५९ रा. आर्वी ता. धुळे) यांनी १ एप्रिल २०१८ ते ३१ ऑगस्ट २०१९ या काळात शासनाकडून वैयक्तीक सभासद लाभार्थ्यांना मंजूर झालेले व शाखेने उघडलेल्या नुकसान भरपाई खात्यात जमा असलेल्या रक्कमे पैकी एकुण ३१ लाख १ हजार १८८ रूपये हे वेळोवेळी संबंधीत सभासद खातेदारांना अदा न करता त्यांच्या नावाने बनावट सह्या व अंगठ्यांचे विड्रॉल स्लीप बनवून त्याव्दारे ही संपूर्ण रक्कम हडप केली. तसेच मेथी विकास सोसायटीचे सचिव अर्जुन गोरख भिल यांच्या व पत्नीच्या खात्यावर देखील शाखाधिकारी बाविस्कर यांनी शासन नुकसान भरपाईच्या रक्कमा जमा केल्यामुळे भिल यांनी रक्कमा काढल्या आहेत.
बाविस्कर यांनी शासन व बँक तसेच शेतकरी सभासदांचा विश्वासघात करीत नुकसान भरपाईच्या रक्कमा स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेत अपहार केला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ३० ऑगस्ट २०२२ रोजी सभेतील ठराव क्र. २० प्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आदेश व पत्रानुसार शिरीष बाविस्कर यांच्या विरोधात पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार तत्कालिन शाखाधिकारी शिरीष बाविस्कर याचे विरूध्द भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, ४६३, ४६४, ४६५, ४६८, ४६९, ४७०, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि श्रीराम पवार करीत आहेत.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.













































































