भुदरगड पोलीस ठाण्याच्या प्रगतीपथावर कामाची पहाणी करताना आमदार प्रकाश आबिटकर सोबत शहाजी देसाई, पोलीस निरीक्षक सचिन पाटील, कल्याणराव निकम, बाबा नांदेकर, संदीप वरंडेकर आदी मान्यवर.
गारगोटी प्रतिनिधी – भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे नवीन मंजूर करण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचे काम प्रगतीपथावर असून सदर इमारतीचे काम 1 ऑगस्ट पर्यंत पुर्ण करण्याच्या सुचना महाराष्ट्र पोलीस हौसिंगचे कार्यकारी अभियंता शहाजी देसाई यांना केल्या.
भुदरगड तालुक्याची वाढती लोकसंख्या पाहता भुदरगड पोलीस ठाण्याला अद्ययावत आणि सुसज्ज इमारतींची आवश्यकता होती. सद्यस्थितीमध्ये असणारी इमारत ही कामकाजाच्या दृष्टीने अपुरी पडत असुन सातत्याने नवी इमारत व्हावी याबाबत मागणी केली जात होती. सदर इमारत बांधणेसाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे 5 कोटी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सदर इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. आज या कामाची पहाणी महाराष्ट्र पोलीस हौसिंगचे अधिकारी व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित केली. यावेळी अपुर्ण असलेले कामे दर्जेराव व वेळेत पुर्ण करून 1 ऑगस्ट, 2024 पर्यंत इमारतीचे सर्व काम पुर्ण करण्याच्या सुचना केल्या.
यावेळी कार्यकारी अभियंता शहाजी देसाई, पोलीस निरीक्षक सचिन पाटील, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सुदर्शन पाटील, कल्याणराव निकम, बाबा नांदेकर, संदीपराव वरंडेकर, कनिष्ठ अभियंता अमोल मते, कंत्राटदार मोरे, भगवान पाटील, उपसरपंच सागर शिंदे, ग्रा.पं.सदस्य प्रशांत भोई, भरत शेटके, राहूल चौगले, संदीप देसाई, सचिन पिसे, जितेंद्र भोसले यांच्यासह प्रमुख मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.