आमदार स्वर्गीय पी. एन. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गोकुळ परिवाराच्या वतीने वाहिली श्रद्धांजली…
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघ कोल्हापूर (गोकुळ) च्या संचालक मंडळ मिटिंग मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांना गोकुळ परिवाराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक यांच्या हस्ते स्वर्गीय पी एन पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, महाराष्ट्रातील काँग्रेसचे निष्ठावंत, सहकार क्षेत्रातील जाणकार नेतृत्व तसेच सार्वजनिक प्रश्नावर तळमळीने व प्रमाणिकपणे काम करणारे म्हणून ओळख असलेले व्यक्तीमत्व स्वर्गीय पी.एन.पाटील हे होते. गोकुळच्या वाटचाली मध्ये आमदार पी. एन. पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळने चांगली प्रगती केली त्यांच्या निधनाने सहकार व सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असल्याचे मनोगत व्यक्त केले.
तसेच गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले कि, आमदार पी. एन. पाटील हे एक अभ्यासू व संयमी नेतृत्व होते, यांचे निधनाने सहकार क्षेत्रातील मोठा मार्गदर्शक गमवला असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थितीत संचालक यांनी स्व. पी. एन. पाटील यांच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजीत तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, चेतन नरके, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.