दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँकेच्या संचालक विरुद्ध विनयभंगाची तक्रार…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

बँकेचे संचालक किरण दलाल यांच्या विरुद्ध शिरपुर पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याच्या तक्रार अर्जामुळे खळबळ…

शिरपूर (प्रतिनिधी) – दि शिरपूर मर्चंटस को-ऑप बँकेचे संचालक किरण दलाल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे बाबत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सरोजताई पाटील,अध्यक्षा धुळे जिल्हा जागृत जनमंच, रा. पवन नगर, खर्दे ता. शिरपूर जि. धुळे यांनी 30 डिसेंबर 2023 रोजी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दिला आहे. यात किरण दलाल यांनी त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवून कारवाई करावी असे म्हटले आहे. यामुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

मिडीयाला दिलेल्या या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, सरोज पाटील या धुळे जिल्हयात तसेच शिरपूर तालुक्यात अन्याय व भ्रष्ट्राचार करणाऱ्यांविरूध्द लढा देत असतात. त्यामुळे त्या २८/१२/२०२३ रोजी दुपारी तीन वाजता बँकेत नातेवाईक श्रीमती कमलबाई अभिमन महाजन यांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे त्यांना शिरपूर मर्चट बँकेतुन त्यांच्या ठेवींची रक्कम मिळत नव्हती. त्यामुळे मी मॅनेजर संजय कुलकर्णी यांच्याशी बोलत असतांना तेथे संचालक किरण दलाल व राजेंद्र पंडीत हे दोन्ही आले व ते पाटील यांच्याशी  हुज्जत घालु लागले. “तुम्ही बँकेत यायचे नाही” असे सांगुन मला दमदाटी करू लागले व “बँकेच्या बाहेर निघा”, असे म्हणून त्यांना धक्का मारून त्यांच्या  हातातील मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला.

त्यात प्रामुख्याने किरण दलाल यांनी डॉ. सरोज पाटील याांचा दोन वेळा हात पकडला, त्यामुळे त्यांना हात लावु नका म्हणून सांगत असताना, “तुझ्याकडून जे होईल ते कर”, असे सांगून दादागिरी केली व सरोज पाटील महिला असतांना सुध्दा त्याांचा हात धरून व धक्का लावुन विनयभंग केला आहे. तरी त्यांच्यावर विनयभंगाची केस दाखल करून गुन्हा नोंद करावा. तसेच त्यांना साथ देणारे बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी गोपाल गुजराथी व शिपाई गौतम थोरात यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सरोज पाटील याांनी केली आहे. सदरहू घटनेची रेकॉर्डींग क्लिप माझ्या मोबाईल मध्येही असून बँकेच्या सी. सी. टी. व्ही. मध्ये माझ्याद्वारे उल्लेख केलेल्या घटनेचा वेळेत या बँकेकडून सुध्दा सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात यावे. असेही तक्रारदार डॉ सरोजताई पाटील यांनी अर्जात नमूद केले आहे. या तक्रारी ची प्रत माहितीस्तव १) मा.जिल्हा पोलीस अधिक्षक सो. धुळे आणि २) मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. शिरपूर यांच्याकडे देण्यात आली आहे. उल्लेखनीय आहे कि, सदरहू घटनेची मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडिया वर फिरत होती त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.