विनायक जितकर
बिद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरु…
बिद्री प्रतिनिधी – बिद्री सहकारी साखर कारखाना व कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संदर्भात आज आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी, भुदरगड, आजरा, कागल, तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा व शेतकरी सभासदांचा संवाद मेळावा सिद्धिविनायक मंदिर तुरंबे येथे पार पडला.
यावेळी राजेखान जमादार बोलताना म्हणाले बिद्री कारखाना लै भारी म्हणणाऱ्यांनी कसा लै भारी ते दाखून द्यावे. को – जन चा फायदा गेला कुठे के. पी. पाटील हटाव बिद्री बचाव ची हाक अरुणराव जाधव यांनी दिली. बिद्री कारखान्यात तीन प्रकारची साखर तयार होते. मग सभासदांना निकृष्ट दर्जाची साखर का ? बिद्री च्या काट्याचं काय ? बिद्री चे एक्स्पानशन करताना इतकी दिरंगाई का केली याचे उत्तर के. पी. पाटील यांनी द्यावे असा सवाल सभासदांनी उपस्थित केला. यावेळी मान्यवर व कार्यकर्त्यांची भाषणे झाली. |
आमदार आबिटकर यांनी आपल्या भाषणात के. पी. पाटील यांच्या बिद्रीतील अजब कारभाराचा पाढाच वाचला. बिद्री चा ऊस दर्जेदार व रिकव्हरी चांगली आहे मग बिद्री ने एफ. आर. पी. पेक्षा जास्त दर का दिला नाही. आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी सभासद वाढवून 5000 चा शेअर्स 15000 हजार झाला मग हा पैसा गेला कुठे ? को – जन चा 40 कोटी चा नफा गेला कुठे ? बिद्री कारखान्याच्या सभासदांची व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली गेली आहे. बिद्री च्या एक्स्पानशनला 25 वर्षे का लागली. माती परीक्षण कार्यशाळेला दिरंगाई का झाली ? कारखान्याच्या क्षेत्रातील ऊस विकासाकडे दुर्लक्ष का केले गेले ? असे सवाल करून पुढे म्हणाले बिद्री वाचवण्यासाठी बिद्री कारखाना निवडणूक लढवायची आहे. शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या हितासाठी बिद्री ची निवडणूक महत्वाची व जिंकायची आहे असे आमदार आबिटकरांनी बोलताना सांगितले.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, राजेखान जमादार, अरुणराव जाधव, केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टी, नंदकुमार ढेंगे, नंदकिशोर सूर्यवंशी, के. जी. नांदेकर, नंदकुमार पाटील, दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम, अशोकराव फराकटे, विजय बलुगडे, सचिन वारके, अशोक वारके याचं बरोबर मतदार संघातील कार्यकर्ते, सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.