पट नऊ गाणी बावीस बेरडेवाडीच्या चिमण पाखरांनी केला सदाबहार कार्यक्रम

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शिराळा (जी.जी.पाटील)

बेरडेवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद केंद्र शाळा बेरडेवाडी ता. शिराळा येथे मुलांचा “सांज चिमणपाखरांची” सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण आणि दानशूर व्यक्तींचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटन आरळा गावचे विद्यमान सरपंच सौ बाळाबाई धामणकर, प्रकाश धामणकर, ग्रामपंचायत सदस्य फैयाज डांगे, समाजसेवक शंकर मोहिते, नवतरुण मित्र मंडळ शिवतेज ग्रुप प्रतिनिधी आनंदा हरी बेरडे, रामचंद्र बेरडे, राजे ग्रुप अध्यक्ष भीमराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत सहयोगी शिक्षिका सविता पाटील यांनी केले, प्रास्ताविक मुख्याध्यापक सुप्रिया घोरपडे यांनी केले. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र पोलीस दलात राहुल पाटील यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आलाइयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सदाबहार गीते, शेतकरी नृत्य, लावणी, रेकॉर्डं डान्स, कोळीगीत देशभक्तीपर गीते अशी एकूण बावीस गाण्यावर उत्कृष्टरित्या नृत्याविष्कार सादर करण्यात आला. पटसंख्या नऊ असून देखील तीन तास मुलांनी डोळ्यांचे पारणे फिटावे असे नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वनिता बेरडे व सदस्यांनी केले. सूत्रसंचालन जितेंद्र लोकरे यांनी केले या कार्यक्रमास विश्वास बेरडे, लक्ष्मण कंदारे, महेश बेरडे, बाबासो बेरडे, आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.