डिझेलच्या तुलनेत सीएनजी चलित ट्रॅक्टर वापरामुळे इंधन खर्चात बचत कारखाना कार्यस्थळावर सीएनजी चलित ट्रॅक्टर वापराबाबत मार्गदर्शन कार्यशाळा…
कागल : शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी साखर कारखानदारी मध्ये पुढच्या दहा वर्षाच्या होणाऱ्या बदलाचा वेध घेत योग्यवेळी व योग्य ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, व नवनवीन उपक्रम राबवणे बाबतची शिकवण दिली. त्यामुळेच अधूनिक तंत्रज्ञान व नवनवीन उपक्रम राबविण्यात ”शाहू” नेहमीच एक पाऊल पुढे आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून आम्ही ऊस वाहतुकीमध्ये सीएनजी चलीत ट्रॅक्टर वापरा बाबतचा नवीन उपक्रम हाती घेतला असून डिझेलच्या तुलनेत सीएनजीचलित ट्रॅक्टर वापरामुळे इंधन खर्चात बचत होते हे आता अनुभवातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे पुढील हंगामापासून या उपक्रमाची व्याप्ती वाढवणार आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुप चे अध्यक्ष राजे समरजीत सिंह घाटगे यांनी केले.
कारखाना कार्यस्थळावर सीएनजी चलीत ट्रॅक्टर वापराबाबतच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यामध्ये ते बोलत होते.यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.ते पुढे म्हणाले गत हंगामात शाहू कारखान्याने प्रायोगिक तत्त्वावर नऊ ट्रॅक्टर ना सीएनजी किट बसवले होते त्या वाहनधारकांना वाहतूक खर्चात बचत झाल्याचे निदर्शनास आले आहे. याचा फायदा शेतकऱ्यास पर्यायाने कारखान्याला होणार असलेने येत्या काळात जास्तीत जास्त ट्रॅक्टरना सीएनजी किट बसूवून याची व्याप्ती वाढवणार आहोत त्या अनुषंगाने केंद्रीयमंत्री मा. नितीन गडकरी साहेब यांना वाहनधारकांच्या शिष्टमंडळासह भेटून त्यासाठी पंचवीस टक्के अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. सीएनजी गॅस भरणे साठी लांबच्या अंतरावर जावयास लागू नये म्हणून कारखाना कार्यस्थळावर सीएनजी गॅस पंप लवकरच उभा करू असे ही ते म्हणाले. यावेळी इको एनर्जीचे संचालक योगेश शहा म्हणाले सीएनजी गॅस किटमुळे ट्रॅक्टरला कोणताही धोका होत नाही. ट्रॅक्टरची कार्यक्षमता वाढून डिझेल बचत होते.डिझेलच्या तुलनेत सीएनजी गॅस किट वापर फायदेशीर असून त्याचा इतर ट्रॅक्टरधारकांनीही अवलंब करावा. असे आवाहन सीएनजी चलित वाहनधारकांनी आपल्या मनोगतातून केलेया कार्यक्रमास कारखान्याचे संचालक, तोडणी वाहतूक कंत्राटदार, वाहन मालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत शेती अधिकारी रमेश गंगाई यांनी केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले.आभार संचालक सचिन मगदूम यांनी मानले.
सीएनजी कीटधारकांना अनुदान मिळण्यासाठी राजेंनी पाठपुरावा करावा सीएनजीचलती गॅस किट वापरकर्ते विजय नाईक व विश्वनाथ मगदूम यांनी समरजितसिंह घाटगे यांनी ही संकल्पना राबविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून केंद्र सरकारकडे सीएनजी कीटधारकांना अनुदान मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करावा. अशी आग्रही विनंती केली.