विनायक जितकर
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांची बैठक
कोल्हापूर – शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १४ जुलैला कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, मुख्यमंत्री शिंदे यांचा महिनाभरातच दुसरा कोल्हापूर दौरा होणार आहे.

पेटा इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या सभेला येतील आणि पेटाळा मैदानावर शिवसैनिकांच्या गर्दीचा महापूर दिसेल, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. मुख्यमंत्री ना. मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन येथे बैठक पार पडली. यावेळी क्षिरसागर बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी बोलताना कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या यादीतून राजेश क्षीरसागर यांची निवड होवून, कोल्हापूरचे पालकमंत्री राजेश क्षीरसागर व्हावेत, अशी आई अंबाबाई चरणी प्रार्थना असल्याचं सांगितलं. यावेळी जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, राहुल चव्हाण, नंदकुमार मोरे, रमेश खाडे, प्रा. शिवाजी जाधव, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, महिला आघाडी प्रमुख मंगलताई साळोखे, पुजा भोर, पवित्रा रांगणेकर, गौरी माळदकर, यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.