विनायक जितकर
पक्ष बळकट करण्यासाठी जोमाने काम करणार
कोल्हापूर – आम आदमी पार्टी प्रदेश कार्यकारणीच्या नियुक्त्या नुकत्याच पार पडल्या. यामध्ये पक्षाच्या प्रदेश संघटन सचिव पदी संदीप देसाई यांची निवड झाली. निवडीचे पत्र राष्ट्रीय महासचिव डॉ. संदीप पाठक, प्रभारी दीपक सिंगला व सह-प्रभारी गोपाल इटालिया यांच्या सहीने दिले गेले.
देसाई यांना पक्षाने कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यामध्ये संघटन बांधणी करण्याची जबाबदारी दिली आहे. प्रदेश संघटन सचिव या पदामुळे जबाबदारी वाढली असून पक्ष बळकट करण्यासाठी जोमाने काम करणार असल्याचे देसाई यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.