राष्ट्रीय छात्र सेनेच्या अमृत महोत्सवी वर्षात युवती सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय सायकल शिबिराचे आयोजन…
कोल्हापूर – ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रानी अमूल्य योगदान दिले आहे. राष्ट्रीय छात्र सेनेची स्वातंत्र्यानंतर उभारणी सनदशीर मार्गाने झाली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या उभारणीस अमृत महोत्सवी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून भारतीय संरक्षण दलास बळ मिळाले आहे.
अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्रीय छात्र सेना महा संचालनायलय दिल्ली मार्फत कन्याकुमारी ते दिल्ली 3232 किलोमीटर अंतराची सायकल रॅली आयोजित केली आहे. सायकल रॅली ची सुरुवात दिनांक 8 डिसेंबर रोजी कन्याकुमारी येथून झाली आहे. सदर रॅली एनसीसी ग्रुप कोल्हापूर येथे 25 डिसेंबर 2023 रोजी येणार आहे. 26 डिसेंबर 2023 रोजी सायकल रॅली कोल्हापूर मधून सातारा सैनिक स्कूल सातारा कडे प्रस्थान करेल. सदरच्या महिला शक्ती अभेद्य सफर सायकल रॅलीत अकरा एनसीसी विद्यार्थिनी आणि चार अधिकारी सहभागी होणार आहेत. एकविसाव्या शतकातील महिला सक्षमीकरणाचा संदेश सदरच्या रॅलीतून भारतभरात दिला जाणार आहे.
सायकल रॅलीचे स्वागत ब्रिगेडियर अभिजीत वाळंबे ग्रुप कमांडर कर्नल मानस दीक्षित कमांडिंग ऑफिसर पाच महाराष्ट्र एनसीसी बटालियन कोल्हापूर कर्नल सुहास काळे प्रशासन अधिकारी सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले ट्रेनिंग जे. सी. ओ. सचिन पाटील आणि पाच महाराष्ट्र एन सी सी बटालियन स्टाफ यांचे मार्फत केले जाणार आहे.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.














































































