WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

अमावस्या आणि ती स्मशानातील रात्र…!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

“स्मशानातील अमावस्येची विज्ञानमय रात्र” या अंधश्रध्दा निर्मुलन कार्यक्रमास गावकरी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने सामाजिक न्याय पर्व अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा याबाबत समाजामध्ये जाणीव जागृती होण्याबाबत, या अधिनियमाबाबत व अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याविषयी जनजागृती होण्यासाठी वडणगे ता.करवीर येथील स्मशानभूमीमध्ये याबाबत जनजागृती करण्याचे आयोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास गावकरी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.

प्रास्ताविकामध्ये सरपंच संगिता शहाजी पाटील यांनी हा कार्यक्रम वडणगे स्मशानभूमीत घेण्याचे महत्वकांशी पाऊल उचलल्याबद्दल, सहायक आयुक्त विशाल लोंढे, उपसरपंच, ग्रामसेवक श्री. भगत व इतर सदस्य व ग्रामस्थांचे आभार मानले. राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक अनिष्ठ रुढी, परंपरांना मुठ माती दिली व समाजामध्ये याबाबत प्रबोधन व्हावे याकरीता मोफत शिक्षणास प्राधान्य दिले. राजर्षी शाहू महाराज त्यांच्या राजवाडयावरुन सोनतळी या ठिकाणी जाण्या-येण्याचा मार्ग याच स्मशानभुमी मार्गावरुन होता. आज सामाजिक न्याय विभागाने व ग्रामपंचायत वडणगे यांनी “स्मशानातील अमावस्येची विज्ञानमय रात्र” या अंधश्रध्दा निर्मुलन कार्यक्रमचे नियोजन करुन राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केले असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा अध्यक्ष प्राचार्य विलास पवार यांनी मांडले.

कार्यक्रमाच्या माध्यमामधुन नागरीकांना, विद्यार्थ्यांना अंधश्रध्दा या विषयावर माहिती व्हावी तसेच अंधश्रध्दा निर्मूलन, बुवाबाजी, जादुटोणा याविषयावर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासो मुल्ला यांच्यामार्फत प्रबोधन करण्यात आले. खगोल अभ्यासक किरण गवळी यांच्याकडून अवकाशातील ग्रह, तारे, राशी, नक्षत्र आदींची ओळख व खगोल शास्त्र, भूगोल शास्त्र, विज्ञानाबाबत सोप्या शब्दामध्ये पॉवर पॉईट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. तसेच गॅलिलिओने लावलेल्या दुर्बिणीचा शोध व कालांतराने त्यामध्ये झालेला बदल याबाबत माहिती दिली. त्यानंतर काळोख्या अंधारात अवकाश दर्शन घडवून या क्षेत्रातील गैरसमज दूर करुन विज्ञानवादी होण्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

यादव यांनी उपस्थित गावकरी व विद्यार्थ्यांना अंधश्रध्दा निर्मूलनाबाबत विनोदी शैलीतून मार्गदर्शन केले. तसेच अंधश्रध्दा निर्मूलन कार्यकर्त्या श्रीमती सीमा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन परब यांनी केले तर आभार वडणगेचे माजी उपसरपंच सयाजी घोरपडे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजकल्याण निरिक्षक कल्पना पाटील, निलम गायकवाड, सुरेखा डवर, सविता शिर्के, सचिन कांबळे तसेच वडणगे ग्रामपंचायतीचे कर्मचारी, तरुण मंडळे यांनी परिश्रम घेतले.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.