रात्रीची वेळ ठरली तिघांसाठी जीवघेणी… सोळांकुर गावावर शोककळा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सरवडे ते मांगेवाडी गावानजीक भीषण अपघात

राधानगरी- विजय बकरे

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

राधानगरीः कोल्हापूर जिल्हा नजीक कर्नाटक हद्दीवर निपाणी फोंडा राज्य मार्गावर सोळांकूर गावातील तीघा तरूण मुलांवर मंगळवार रात्री १२.३० ची वेळ काळरात्री ठरली. रोहन संभाजी लोहार, आकाश आनंदा परीट, शुभम चंद्रकांत धावरे (सर्व रा. सोळांकूर) अशी तिघा तरुण मृत मुलांची नावे आहेत. तर अन्य चौघेजण याच अपघात जखमी झाले आहेत. ऋत्विक  राजेंद्र पाटील, भरत तानाजी पाटील, सौरभ सुरेश तेली, संभाजी हनुमंत लोहार अशी गंभीर जखमी तरुणांची नावे आहेत. निपाणी –  फोंडा राज्य मार्गावर राधानगरी गावच्या नदी पुलावर बोलेरो (MH42H3064 ) व मालवाहतूक ट्रक (KA28AA8206)  यांच्यात समोरासमोर झालेल्या भिषण अपघातात तिघांचा मृत्यू तर चौघेजण जखमी झाले आहेत. ऐन गणेशोत्सवात हा अपघात झाल्याने व करतीसवरती मुले अचानक गेल्याने सोळंकुर गावावर व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

राधानगरी अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू

याबाबत घटनास्थळवरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बोलेरो व मालवाहतूक ट्रक यांच्यात ही धडक झाली. राधानगरी गावातील नदीवर पश्चिम बाजूच्या वळणावर गारगोटीहुन  सोळंकुर येथे आपल्या गावी बोलेरोतून रोहन संभाजी लोहार व त्याचे मित्र येत होते. त्याचवेळी, राधानगरीकडून मुद्दाळ तिठ्ठा या मार्गाकडे ट्रक जात असताना, दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या झालेल्या भिषण धडकेत बोलेरोमधील  रोहन संभाजी लोहार, आकाश आनंदा परीट, शुभम चंद्रकांत धावरे तिघे राहणार सोळंंकुर हे जागीच ठार झाले. अन्य चौघे मित्रांमध्ये ऋत्विक  राजेंद्र पाटील, भरत तानाजी पाटील, सौरभ सुरेश तेली, संभाजी हनुमंत लोहार हे गंभीर जखमी आहेत. अज्ञात ट्रकचालकाने बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवल्याने तसेच मयत व जखमींना कोणतीही मदत न करता अपघाताचे गांभीर्य लक्षात येऊन सुद्धा तिथून तो पसार झाल्यामुळेल संबंधित चालकावर राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात ट्रकचालक विरुद्ध राधानगरी पोलीस ठाणेमध्ये फिर्यादी राजेंद्र मनोहर लोहार (मु. पो. सोळांकुर) यांनी फिर्याद दिली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर, अंमलदार अंबुलकर करत आहेत. ऐन गणेशोत्सवात हा अपघात झाल्याने व करती सवरती मुले अचानक गेल्याने सोळंकुर गावावर व पंचक्रोशीत शोककला पसरली आहे.

मिळणार पाच लाख…. वाट पहा; २५ सप्टेंबरची! वाचा सविस्तर, करा तयारी!!! अधिक वाचली गेलेली बातमी.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.