‘एआय’मुळे रोजगाराचा चारपट वर्षाव; पण एआय साक्षर मनुष्यबळाचा तीव्र दुष्काळ – प्रा. किरणकुमार जोहरे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जागतिक साक्षरता दिनानिमित्त विशेष कार्यशाळा

नाशिक/कळवण/पिंपळगाव बसवंत :
“२०२५ हे वर्ष ‘एआय’चे वर्ष ठरले आहे. वार्षिक १६०० कोटी रुपयांचा रोजगार आज एआय क्षेत्रात उपलब्ध आहे. एका नोकरीवर एआयचा गदा आला तरी त्याच्या बदल्यात चारपट नवीन रोजगार संधी निर्माण होत आहेत. पण एआय साक्षर मनुष्यबळाचा तीव्र दुष्काळ आहे. त्यामुळे अस्तित्वाच्या लढाईत टिकायचे असेल, तर प्रत्येकाने एआय शिकलेच पाहिजे,” असे प्रतिपादन एआय तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले.

कळवण एज्युकेशन सोसायटीच्या मानूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान मंडळाच्या उद्घाटनानंतर आयोजित ‘सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता : व्याप्ती, संधी आणि धोके’ या कार्यशाळेत ते बोलत होते.

प्रा. जोहरे म्हणाले, “जगात एआयची क्रांती वेगाने घडत आहे. चीनमधील ‘झिन झियाओमेंग’ ही पहिली रोबोट न्यूज अँकर, कोरोनात रुग्णालयातील रोबोट उपचार, नागपूरमधील ‘रोबो २.०’ रेस्टॉरंट, अमेरिकेत पगार न घेता शिकवणारी ‘बीना४८’ शिक्षिका आणि बंगळुरू–मुंबईतील रोबोट शिक्षक हे भविष्य नव्हे, तर वास्तव आहे. डार्विनच्या नियमानुसार, लायक तेच टिकतील. त्यामुळे एआय साक्षरता हीच खरी गुरूकिल्ली आहे.”

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, “२०२५ अखेरपर्यंत ९.५ कोटी नवीन उच्च पगाराच्या नोकऱ्या जगभरात निर्माण होतील. एआयमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात एआय स्पेशालिस्टचा सरासरी वार्षिक पगार २४ लाखांहून अधिक आहे.”

    • एआय कसे कार्य करते याचे पाच टप्पे – डेटा संग्रह, प्रक्रिया, मॉडेल प्रशिक्षण, निर्णय व फीडबॅक – विद्यार्थ्यांना त्यांनी सोप्या भाषेत समजावले. शिक्षण, आरोग्य, कृषी, सुरक्षितता आदी क्षेत्रांतील संधींचे चित्रण करताना ते म्हणाले, “हवामान बदल, लोकसंख्या वाढ व अन्नसुरक्षेच्या आव्हानांवर एआय वरदान ठरू शकते. अचूक शेती, हवामान अंदाज, पीक आरोग्य निरीक्षण यामुळे शेतकऱ्यांचे जीवन बदलू शकते.”

याही बातम्या अधिक वाचल्या गेल्या… लिंकला क्लिक करा… 

“युवकांनो, व्यसनाला नाही म्हणा – नाशिक पोलिसांचा संदेश”

महाराष्ट्रात हवेत १८ एक्स बॅंड डॉप्लर रडार नेटवर्क -प्रा. किरणकुमार जोहरे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मविप्र क.का.वा. इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा झेंडा

या वेळी त्यांनी एआय सोबत आयओटी, एआर-व्हीआर, मशिन लर्निंग, क्वांटम कॉम्प्युटिंग, ब्रेन-टू-मशीन इंटरफेस यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. ‘पिक्चर अभी बाकी है दोस्त!’ अशा शब्दांत त्यांनी भविष्यातील रोमांचक संधींचे चित्र रंगवले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन रावसाहेब शिंदे होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भाऊसाहेब पगार यांनी केले. सूत्रसंचालन संज्योती चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. एम. डी. वाघ यांनी मानले.कार्यशाळेला प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी एआयच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला. अडीच तासांचे प्रा. जोहरे यांचे भाषण माहितीपूर्ण, रोचक व ज्ञानवर्धक ठरले. कार्यशाळेत चेअरमन रावसाहेब शिंदे, प्राचार्य डॉ. बी. एस. पगार, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. एम. पगार, प्रा. डॉ. एम. डी. वाघ, प्रा.  डॉ. एन. बी. कोठावदे, प्रा. डॉ. बी. सी. कछवा, प्रा. डॉ. व्ही. एम. पगार, प्रा. डॉ. एस. जे. पवार, प्रा. एम. यु. देवरे, प्रा. वाय. पी. बागुल, प्रा. जी. जी. चौधरी, प्रा. जी. एस. चौधरी, प्रा. वाय. ए. गांगुर्डे, प्रा. एस. जी. साबळे, प्रा. श्रीमती एम. व्ही. बोरसे, प्रा. श्रीमती एम. बी. घोडके, प्रा. श्रीमती व्ही. एस. इंगळे, प्रा. श्रीमती पी. पी. वाघेरे, प्रा. श्रीमती ए. एन. आहेर, प्रा. श्रीमती एन. डी. आहेर, प्रा. श्रीमती ए. व्ही. आहेर, प्रा. श्रीमती एम. एस. सोनवणे, प्रा. श्रीमती व्ही. बी. पगार, प्रा. श्रीमती डी. ए. पवार, प्रा. डॉ. श्रीमती एच. डी. मांडे उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.