इलेक्ट्रॉनिक्स हा श्रीमंत होण्याचा राजमार्ग… ‘मविप्र’ क. का. वाघ महाविद्यालयाचे इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे यशस्वी विद्यार्थी…
नाशिक – येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पिपळगाव बसवंत येथील क.का. वाघ महाविद्यालयातील सहा विद्यार्थां सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीत्तर पदवी इलेक्ट्रॉनिक्स सायन्स विषयात प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यशाची परंपरा कायम ठेवत यंदा विद्यापीठातील ३० जागांत तब्बल ६ विद्यार्थांची म्हणजे २० टक्के जागांवर नाशिक जिल्ह्यातील एकाच महाविद्यालयातील एकाच विभागाचे विद्यार्थी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची तसेच नोकरीची संधी यामुळे विद्यार्थांना मिळणार आहे. ज्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रात चर्चा व कौतुक होत आहे.
मविप्रच्या ४९२ शाखांपैकी एका ग्रामीण भागातील क.का. वाघ कॉलेज या महाविद्यालयातून एकाच वेळी इलेक्ट्रॉनिक सायन्स या अत्यंत जागतिक मागणी असलेल्या तंत्रज्ञान शाखेतून एवढ्या मोठ्या संख्येने विद्यापीठात एकाचवेळी निवड होण्याची हि पहिलीच वेळ आहे.
यावेळी महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक्सचे निवड झालेले राम पाटील, ज्योती पगार, अविनाश बोरस्ते, ऋतृजा लहितकर, गणेश आहेर, अंजली पाटील आदीं विदयार्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग प्रमुख व आयक्यूएसी कोऑर्डिनेटर प्रा. भगवान कडलग, प्रा धनंजय कडलग, प्रा. राणी जगताप व प्रा. किरणकुमार जोहरे हे उपस्थित होते.
मविप्र क. का. वाघ महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागाच्या या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालक श्रीमती शोभाताई बोरस्ते, मविप्र शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र मोरे, सुनिल पाटील. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे आदीसह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत निवड झालेल्या विद्यार्थांना पुणे येथे रवाना होत असतांना निरोप देत अभिनंदन व कौतुक केले.
‘इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी’त जागतिक स्तरावर सर्वाधिक नोकऱ्या!
नाशिक हे जागतिक इलेक्ट्रॉनिक्स हब होत असतांनाच जागतिक पातळीवर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीला मागणी असून पृथ्वीवरील एक लाख आर्थिक श्रीमंत यादीतील सर्व व्यक्ती या इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाशी जोडल्या गेलेल्या असून पृथ्वीवर आज ३७ टक्क्यांपेक्षा जास्त नोकऱ्या केवळ इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी क्षेत्रात आहेत तसेच नोकरीचे १५०० पेक्षा जास्त करीयर पर्याय उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक्स हा श्रीमंत होण्याचा राजमार्ग आहे.
मविप्र क. का. वाघ महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स सायन्स विभागात आर्टिफियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता), इंटरनेट ऑफ थिंग्ज (वस्तुमात्रांचा परस्पर संवाद), डेटा सायन्स (माहितीसाठा विज्ञान) आदी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवर प्राध्यापक व विद्यार्थी संशोधन करीत असून नवीन प्रणाली विकसित करीत आंतरराष्ट्रीय पातळीवर रिसर्च पेपर प्रकाशित करण्यासाठी प्रोजेक्ट आराखडा देखील बनविला आहेत. महाविद्यालयात कॉम्प्युटर्स सह अद्यावत उपकरणे, किटस् व संशोधनासाठी साधनसामुग्री उपलब्ध असून एकट्या इलेक्ट्राॅनिक्स विभागातून आंतरराष्ट्रीय पातळीवर ४० पेक्षा जास्त रिसर्च पेपर्स तसेच हवामान, शेती तंत्रज्ञान संदर्भातील सहा वैयक्तिक पेटंट प्रकाशित असून यापैकी एक पेटंट भारत सरकारने अधिकृत पणे ग्रांट (बहाल) केले आहे.