कृषी महाविद्यालय पाल (गारगोटी) येथील बी.एस्सी.(ॲग्री) प्रवेश प्रक्रिया सुरु – अर्जुन आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

बी.एस्सी.(ॲग्री) साठी इच्छुकांनी प्रवेश घेण्याचे प्राचार्य अर्जुन आबिटकर यांचे आवाहन…

गारगोटी – युवा ग्रामीण संस्था संचलित महात्मा फुलेकृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय पाल (गारगोटी) बी.एस्सी. (ॲग्री) साठी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून महाविद्यालयीन स्तरावरील प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 28 ऑगष्ट ते 31 ऑगष्ट पर्यंत कृषी महाविद्यालय पाल येथे संपर्क करावा. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना सीईटी, नीट, एआयईईई परीक्षा दिली आहे. आणि बी.एस्सी ॲग्रीसाठीचा फॉर्म भरला आहे पण ज्या विद्यार्थ्यांना कॅप व स्पॉट राउंड मधुन कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन या जागेवर प्रवेश घ्यावा. कृषी महाविद्यालयीन कृषी शिक्षणाबरोबर कृषी पूरक व्यवसाय, प्रक्रियाकेंद्र, रोपवाटिका संशोधनकेंद्र असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या संकुलामुळे कृषी शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होतील महाविद्यालयात मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे फी मध्ये शासनाच्या विविध स्कॉलरशिपचा फायदासुध्दा विद्यार्थ्यांना घेता येईल. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या 9049711305, 7892628986 या क्रमांकावर संपर्क करावा.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.