आजच … मनासारखा घ्या… नंबर चाँईस करा..आपल्या दुचाकीच्या हाैशी नंबरची नाेंदणी करा

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

 कोल्हापूर: नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी अंतर्गत हातकणंगले व शिरोळ कार्यालयामार्फत नवीन दोन चाकी MH51D नोंदणी मालिकेचे दि. 4 ऑक्टोबर 2024 पासून कामकाज सुरु करण्यात येत आहे. नवीन दोन चाकी MH51D पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 4 ते 8 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेत कार्यालयात स्वीकारण्यात येतील.

वाहनधारकांनी वाहन नोंदणी क्रमांकांची मागणी करतेवेळी या सुचनांचे पालन करावे

पसंती नोंदणी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारक हा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातीलच असणे आवश्यक 

पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ रकमेचा डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश (Cheque) किंवा पेऑर्डर स्वीकारला जाणार नाही, असे अर्ज बाद समजण्यात येतील. डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) काढताना DY REGIONAL TRANSPORT OFFICE. ICHALKARANJI या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक लिहलेला असणे आवश्यक असेल.

नवीन दोन चाकी तसेच चार चाकी वाहनांच्या पसंती क्रमांकाबाबत दि. 4 ते 8 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेत अर्जासोबत मूळ रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) सादर करावा.  दि. 8 ऑक्टोबर 2024 रोजी पाच वाजल्यानंतर पसंती क्रमाकांच्या व (लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या) याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

ज्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त मागणी अर्ज प्राप्त झाले असतील अशा नोंदणी क्रमांकाचा लिलाव दि. 9 ऑक्टोबर 2024 करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने जादा रकमेचा एकच स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) बंद लिफाफ्यात सकाळी 9.45 ते 3 या कालावधीत कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील. एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता कार्यालयात घेण्यात येईल. लिलावासाठी फक्त अर्जदार प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल. लिलावासाठी येताना अर्जदाराने आपले ओळखपत्र व प्राधिकृत प्रतिनिधी यांच्याकडे प्राधिकारपत्र व स्वतःचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.

आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना आधार कार्डला संलग्न असलेला मोबाईल क्रमांक व पत्ता अर्जावर लिहणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक लिहला नसल्यास यादीमध्ये नाव आलेतरी आपला कोणताही हक्क आकर्षक नोंदणी क्रमांकावर राहणार नाही. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येत नाही. आकर्षक नोंदणी क्रमांक घेतलेल्या तारखे पासून सहा (6) महिन्याच्या आत वाहन नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. अन्यथा आपला क्रमांक आपोआप रद्द होईल.

तथापी शुल्क सरकार जमा हाईल आणि हे शुल्क परत करता येत नाही यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. मागणी केलेल्या आकर्षक क्रमांकाची पावती झाल्यानंतर पावती झाल्याचा संदेश आधार नंबरशी नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर प्राप्त झाल्यानंतर त्याचदिवशी पावती घेण्याकरीता स्वतः हजर राहून पावती तपासून घ्यावी. दुस-या दिवशी पावतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.

आकर्षक क्रमांकाच्या नियमीत पावत्या दि. 10 ऑक्टोबर 2024 पासून सुरु करण्यात येतील. मागणी अर्ज व आकर्षक क्रमांकाच्या फी चा धनादेश वाहनधारकाने फी ची खात्री करुनच जमा करावा. जरी नजर चुकीने धनादेश घेतला गेला व नंतर पडताळणी करताना कार्यालयाच्या निदर्शनास आले तर लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करण्यात येईल, असेही इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.