WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

आयोध्येसाठी जाणार! राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून धावणार

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयोध्येसाठी जाणार

योजनेत निवड झालेल्या 800 ज्येष्ठ नागरिकांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिनंदन

 कोल्हापूर :  राज्यात सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयोध्येसाठी दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी जाणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याकरीता कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत तीर्थदर्शनासाठी 2 हजार 146 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 1 हजार 983 अर्ज पात्र झाले असून त्यामधील 800 लाभार्थी लॉटरी पद्धतीने निवडले गेले आहेत. “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” निवड झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे व राज्यात प्रथम क्रमांकाने कोल्हापूर जिल्हा “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” या योजनेचा लाभ घेत असल्याबाबत सर्वांचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या जिल्हा समितीचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना राज्य व देशातील तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राबविण्यात येत आहे.

 

दि. 14 जुलै च्या शासन निर्णयानुसार लाभार्थीची निवड करण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक तालुका ठिकाणच्या लोकसंख्येनुसार तालुका निहाय कोटा निश्चित करून कोट्यापेक्षा जास्त अर्जाची निवड लॉटरीद्वारे केली आहे. ज्या तालुक्यातील अर्ज कमी आले आहेत. त्या तालुक्यांचा कोटा सर्वाधिक अर्ज येणाऱ्या तालुक्याला देण्यात आला आहे. सामाजिक न्याय भवन, कोल्हापूर या ठिकाणी लकी ड्रॉ करण्यात आला.  800 अर्जांची निवड करुन उर्वरित अर्ज प्रतिक्षाधिन ठेवण्यात आले आहेत.

“मुख्यमंत्री तीथ दर्शन योजना” तालुका निहाय प्राप्त अर्जांचा तपशील-

करवीर – 215, हातकणंगले – 171, शिरोळ – 79, कागल – 118, पन्हाळा – 49, भुदरगड – 32, गगनबावडा – 2, शाहुवाडी -3, राधानगरी – 40, आजरा – 3, गडहिंग्लज – 48 व चंदगड 40 असे एकूण 800 लाभार्थी तालुक्यातुन निवडले गेले आहेत.

पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे आयोध्येसाठी होणार मार्गस्थ

 मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या लाभार्थ्यांना आयोध्येला घेवून जाणारी रेल्वे दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.50 वाजता छत्रपती शाहु महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ होणार आहे.

निवड झालेल्या लाभार्थ्यांना इंडीयन रेल्वे कॅटरीन अॅन्ड टुरीझम कारर्पोरेशन लिमिटेड (भारत सरकार) दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.50 वाजता छत्रपती शाहु महाराज टर्मिनस कोल्हापूर येथुन घेऊन आयोध्या येथे 30 सप्टेंबर 2024 रोजी आयोध्या धाम येथे पोहचेल व आयोध्या दर्शन घेऊन परत 1 ऑक्टोबर 2024 रोजी आयोध्या धाम येथून लाभार्थी ज्येष्ठ नागरीकांना घेऊन निघेल व 3 ऑक्टोबर 2024 रोजी छत्रपती शाहु महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहचेल. यामध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांचा प्रवास, निवास, भोजन इ.खर्च महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.