जागतिक बुरशी दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात प्रदर्शन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर, : जागतिक बुरशी दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात विविध प्रकारच्या बुरशींचे दोनदिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यामध्ये रांगोळी, फोटोग्राफी, पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करून त्याद्वारे बुरशी विश्वाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वनस्पतीशास्त्र अधिविभागात शुक्रवार (दि. ४) ते शनिवार (दि. ५) असे दोन दिवस प्रदर्शन पार पडले. प्राणीशास्त्र विभागातील डॉ. एस. आर. यंकंची यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजाराम गुरव यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. संयोजन समिती सचिव डॉ. एस. जी. घाणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सी. आर. पाटील यांनी बुरशी जैवविविधता आणि त्यांचे उपयोग या विषयी उपस्थित विद्यार्थी आणि अभ्यासक, संशोधकांना मार्गदर्शन केले. या प्रदर्शनात बुरशीच्या १०० हून अधिक प्रजाती मांडण्यात आल्या. बुरशीची २०० हून अधिक छायाचित्रे मांडण्यात आली, तर ५० हून अधिक माहितीपर पोस्टरही प्रदर्शित करण्यात आली.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.