“आपली सुरक्षा आपली जबाबदारी”…सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने सातत्यपूर्ण उपक्रम ..

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने सह्याद्री विद्यालय, शिळफाटा खोपोली येथे
7 वर्षापासून शहरी व ग्रामीण भागात सातत्यपूर्ण उपक्रम

शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याच्या मनातील लैंगिक प्रश्नांना व शंकांना व्यक्त होण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने एक हक्काचं सहज व्यासपीठ शाळा व कॉलेज मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून देण्याच्या 7 वर्षापासून सुरू असणाऱ्या या उपक्रमात सातत्य असून याच अनुषंगाने सह्याद्री इंग्लिश विद्यालय,शिळफाटा खोपोली येथे दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले.

उपक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले.लैंगिक शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती तसेच दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या,
आपली सुरक्षा आपली जबाबदारी,स्वरक्षणाचे महत्व, स्वच्छता, सायबर गुन्हे, सतर्कता, स्वरक्षण असे अनेक विषयांवर मार्गदर्शन सहज सेवा फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा इशिका शेलार यांनी केले.शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या शिक्षणामूळे त्यांच्या पुढील वाटचालीस मदत होईल व गुन्ह्यांपासून संरक्षण करता येईल असा आशावाद खोपोली महिला पोलीस हवालदार सरिता परदेशी मॅडम यांनी व्यक्त केला.

या उपक्रमात सहकार्य खा. ता.शि.प्र मंडळचे सह्याद्री इंग्लिश विद्यालयचे शालेय समिती अध्यक्ष श्री.संजय पाटील,मुख्याध्यापिका धनश्री ठकेकर ,पर्यवेक्षिका सना जिलानी,समन्वयक नयना लबडे,सहशिक्षिका अश्विनी सोळंकी,स्वाती सुतार,नमिता शेंडे व शिक्षकेतर स्टाफ यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमात कळत नकळत मदत करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

सहजसेवा फाउंडेशन
( सहज साद.. सहज साथ )

( India Book Of Record मध्ये सामाजिक उपक्रमासाठी नोंद असलेली संस्था )

Helpline No : 99754 92470 /8788110739
www.sahajsevafoundation.com

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.