खासदार धनंजय महाडिक यांची आता  नितीन गडकरींकडे नव्याने केली ही मागणी… वाचा सविस्तर,तुमच्या हिताची बातमी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

*संकेश्वर ते आंबोली या रस्त्याचे चौपदरीकरण करताना गडहिंग्लज आणि आजरा शहरात बायपास रस्ता करावा, 

कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रतील आणि कर्नाटकातील  प्रवाशांची दळणवळणाची मोठी सोय होणार

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

संपूर्ण देशात नवीन रस्ते बांधणी किंवा महामार्गांचे चौपदरीकरण – सहापदरीकरण अशा कामांनी वेग घेतला आहे.  राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले. रेड्डी ते संकेश्वर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548  एच  म्हणून घोषित झाला असून, या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रतील आणि कर्नाटकातील  प्रवाशांची दळणवळणाची मोठी सोय होणार आहे.  

सध्या या चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. संकेश्वर ते आंबोली या मार्गावर गडहिंग्लज आणि आजरा ही दोन तालुकास्तरीय गावे आहेत.  या दोन्ही शहरातून महामार्ग गेल्यास वाहतूक कोंडी निर्माण होऊन, गडहिंग्लज आणि आजरा इथल्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागेल.  शिवाय दाट लोकवस्तीच्या गावातून महामार्ग नेणे, वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीनेही योग्य होणार नाही.  त्यामुळे संकेश्वर ते आंबोली हा चार पदरी रस्ता बनवत असताना, गडहिंग्लज आणि आजरा शहराला बायपास करणारा रस्ता असावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी  गडकरी यांच्याकडे केली.

या मागणीचे पत्र नामदार गडकरी यांना देण्यात आले. नामदार नितीन गडकरी यांनीही खासदार महाडिक यांच्या मागणीबद्दल सहमती दर्शवून, सकारात्मक प्रतिसाद दिला.  त्यामुळे संकेश्वर ते आंबोली हा नवा रस्ता बनताना गडहिंग्लज आणि आजर्‍याला नवीन बायपास रस्ता तयार होईल, अशी खात्री खासदार महाडिक यांनी व्यक्त केली.

 

सध्याचे सुरू असलेले राजकारण हे तुम्हाला प्रतिष्ठेचे व सत्याचे वाटते का?

View Results

Loading ...

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.