पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कन्याकुमारी ते दिल्ली पर्यंत महिला शक्तीचा प्रचार आणि प्रसार, राष्ट्रीय छात्र सेनेचे रॅली कोल्हापुरात दाखल..
राष्ट्रीय छात्र सेनेच्या उभारणीस अमृत महोत्सवी 75 वर्षे पूर्ण होत असल्याने राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून तब्बल कन्याकुमारी ते दिल्ली असे 3232 किलोमीटर अंतराची सायकल रॅली आयाेजित करण्यात आली असून, ही रँली आज काेल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठात दाखल झाली. या रँलीचे स्वागत व फ्लँग दाखवून कुलगुरू डॉ.डी.टी शिर्के यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विद्यार्थ्यांनी अभिवादन करून काेल्हापूरात आल्याने आनंद वाटला अशी प्रतिक्रीया दिली.
भारतीय संरक्षण दलास बळ मिळाले,अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्रीय छात्र सेना महा संचालनायलय दिल्ली मार्फत कन्याकुमारी ते दिल्ली 3232 किलोमीटर अंतराची सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं, आज या रॅलीचे स्वागत शिवाजी विद्यापीठात करण्यात आले. यावेळी ब्रिगेडियर एन. एस. चिराग(सेनामेडल) ब्रिगेडियर अभिजीत वाळंबे, कमांडर कर्नल मानस दीक्षित, कमांडिंग ऑफिसर पाच महाराष्ट्र एनसीसी बटालियन कोल्हापूर ,कर्नल सुहास काळे प्रशासन अधिकारी, सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले,सीओ सचिन पाटील आणि पाच महाराष्ट्र एन सी सी बटालियन स्टाफ चे अधिकारी या स्वागत समारंभास उपस्थित हाेते.
हा देखिल व्हिडीओ पहा,लाईक करा. सबस्क्राईब करा.. https://youtube.com/shorts/W_lclgeR-Yk?si=4xnyngZDoBPmwvip POSITIVVE WATCH
Loading ...
कर्नल व्ही. एम.सिंग (गुजरात) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या सायकल रँलीत अकरा एनसीसी विद्यार्थिनी आणि चार अधिकारी सहभागी आहेत.एकविसाव्या शतकातील देशभरात महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेने कन्याकुमारी ते दिल्ली 3232 किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे,राष्ट्रीय छात्र सेनेच्या अमृत महोत्सवी वर्षात ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रानी अमूल्य योगदान दिलं आहे.सदरच्या महिला शक्ती अभेद्य सफर सायकल रॅलीच्या माध्यमातून देशभर जनजागृती करण्यात येणार असून, ही रँली उद्या सकाळी सातारा, पुणे कडे रवाना हाेत असून, २२ जानेवारी पर्यंत दिल्ली येथे पाेहाेचणार आहे. याठिकाणी पंतप्रधान नरेंद माेदी यांच्याहस्ते या रँलीला फ्लँग दाखवून स्वागत केले जाणार आहे. यावेळी काेल्हापूर येथील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी एनसीसीच्या पद्धतीने दमदार स्वागत केले. यानंतर काेल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती एनसीसी कँडेडेट ने आलेल्या विद्यार्थ्यींनींना दिली.
लाईक करा, सबस्क्राईब करा VIDEO देखिल खूप पाहिला गेला….. https://youtu.be/o9xAHoh4b88- POSITIVVE WATCH
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.