GOOD NEWS-VIDEO पहा-महाराष्ट्र करताेय देशभरातील एनसीसी च्या मुलींचे नेतृत्व; सक्षम, धाडसी वृत्ती-याेगेंद्रसिंह

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
 

देशाच्या भवितव्यासाठी आजच्या मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहाव्यात. यासाठी केंद्र व राज्यसरकारचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. सर्वसामान्य जीवन जगण्याबरोबरच धाडसी, लढाऊ, देश रक्षणासाठी ध्येयदृष्टी डोळ्यासमोर ठेवून मुलींनी पुढे नेतृत्व करावे, म्हणूनच एनसीसीच्या कँडेटसाठी ‘शिवाजी ट्रेल ट्रेकिंग’चे पन्हाळा येथे विशेष ट्रेनिंग सुरु आहे. खडतर परिस्थीतीत छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांनी पन्हाळा ते विशाळगड ही मोहीम कशी यशस्वी केली, त्याचा अनुभव, ती माहिती एनसीसीच्या मुलींना मिळावी व हा शिवाजी ट्रेल ट्रेकींग थरार, तो गनिमी कावा, ती ऐतिहासिक युद्धभूमीचा अनुभव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत न राहता, संपूर्ण देशभरातील मुलींनी, मुलांनी तसेच एनसीसीच्या कँडेटसी सर्वांना सांगावा, हा मूळ उद्देश या मोहिमेचा आहे. या मोहिमेचे नेतृत्व महाराष्ट्र बटालीयनने कोल्हापूरने केले आहे. या मोहीमेतून मुलीं भविष्यात लढवय्या बनतील, नेतृत्वगुणाचे धडे घेतील असा विश्वास शिवाजी ट्रेल ट्रेकींगाचा फ्लँग दाखविताना मेजर जनरल (ADJ-एनसीसी डायरेक्टर) योगेंद्रसिंह यांनी व्यक्त केला.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

VIDEO पाहण्यासाठी क्लिक करा..

https://youtu.be/mdiuMgiFScY?si=3ENZ_etXaGfaCv9u

देशातील पहिली एनसीसी मुलींची एक तुकडी पन्हाळा ते विशाळगड खिंड अशी रवाना झाली. यावेळी मेजर जनरल योगेंद्रसिंह यांच्याहस्ते फ्लँग दाखविण्यात आला. शिवाजी महाराज की जय.. जयभवानी जय जिजाऊ अशा प्रेरणा देणाऱ्या घोषणा देत तुकडीने आगेकुच केली. फ्लँग दाखविताना ब्रिगेडिअर विक्रांत कुलकर्णी, बिग्रेडिअर अभिजीत वाळिंबे, कमांडर पुनीत गोगिया यांच्यास पुणे, बेळगाव, कोल्हापूर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मेजर जनरल याेगेंद्रसिंह व ब्रिगेडीर अभिजीत वाळिंबे

मेजर जनरल योगेंद्रसिंह पुढे म्हणाले की, महाराष्ट्रासाठी हा ग गौरव आहे की, प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने एनसीसीच्या मुलींनी सहभाग दर्शविला आहे. एनसीसीच्या मुलींना कसे , कोठे व कोणत्या परिस्थिती रहावे लागते याचीही शिकवण, या मोहिमेतून मिळणार आहे. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातील उपक्रमांची माहिती देखिल एनसीच्या कँडेटसना मिळावी यासाठी आमचे वर्षभर उपक्रम सुरु असतात. ज्या त्या राज्यातील भौगोलिक स्थिती, तेथील ऐतिहासिक माहिती, अँडव्हेचर यांची माहिती देण्याचा प्रयत्न एनसीसी विभागातर्फे सुरु असून, शिवाजी ट्रेल ट्रेकिंग देखिल एक महत्वाचा भाग आहे. त्याला देशभरातील मुलींकडून प्रतिसाद मिळाला असून, महाराष्ट्र, कोल्हापूरने यशस्वी नेतृत्व केल्याचे कौतुकही मेजर योगेंद्रसिंह यांनी केले.

VIDEO पाहण्यासाठी खालील निळ्या लिंकला क्लिक करा

https://youtube.com/shorts/OyD7_TYpdsw?si=FeoMFNgdz80dj0yq 

ही मोहीम आठ दिवसांची असून, याआधीच मुलांच्या चार तुकड्या आधीच रवाना झाल्या आहेत. आज पहिली मुलींची तुकडी रवाना झाली, मुलांच्या देखिल सर्व तुकड्या यशस्वी मार्गस्थ झाल्याचे ब्रिगेडीअर अभिजीत वाळंबे यांनी सांगितले. ब्रिगेडिअर विक्रांत कुलकर्णी म्हणाले की महाराष्ट्र ही लढव्या थोर पुरषांची भूमी आहे. एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून, या ठिकाणी एनसीसीच्या कँडेटसना येथे खूप शिकण्यासारखे आहे, तोच अनुभव देण्याचा एक उपक्रम शिवाजी ट्रेल ट्रेकिंगच्या माध्यमातून केला जात आहे.

NCC  च्या आणखी बातम्या पाहण्यासाठी या निळ्या लिंकला क्लिक करा…

महाराष्ट्र ही संतांची आणि शौर्याची भुमी- सतेज पाटील

देशभरातील NCC कॅडेट्स अनुभवणार पन्हाळा ते विशाळगड ट्रेकींगचा थरार–शिवाजी ट्रेलट्रेक 2023 मोहिमेला प्रारंभ

 

 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.