जगातील पाचवी आर्थिक महासत्ता म्हणून आता भारताची ओळख…
कोल्हापूर – देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकासाच्या अनेक योजना आणि संकल्पना मांडल्या, आणि त्या सत्यात आणल्या. कोरोना काळात देशातील 80 कोटी जनतेला केंद्र सरकारने मोफत रेशन सुरू केले. ही योजना यापुढील पाच वर्षातही सुरू राहणार आहे. उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, शेतकऱ्यांना भरघोस अनुदान, विश्वकर्मा योजना यासह समाजातील प्रत्येक घटकासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. जगातील पाचवी आर्थिक महासत्ता म्हणून आता भारताची ओळख बनली आहे.
डिजिटल इंडिया पासून ते स्किल इंडिया पर्यंत आणि मेक इन इंडिया पासून ते भारताला विश्वगुरू बनवण्यापर्यंत पंतप्रधान मोदी अखंडपणे काम करत आहेत. आजवर देशाला असे नेतृत्व कधीच मिळाले नव्हते. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांच्यावरील जनतेचा विश्वास वाढत असून, सबका साथ- सबका विश्वास ही घोषणा सत्यात आली आहे. भारत संकल्प यात्रेतून विविध प्रकारच्या शासकीय योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचत आहेत, त्याचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नेर्ली गावामध्ये नुकताच खासदार महाडिक यांच्या हस्ते भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ झाला. विकसनशील भारत संकल्प यात्रेतून विविध शासकीय योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळेच देशभरात या संकल्प यात्रेला वाढता प्रतिसाद आहे, असेही खासदार महाडिक यांनी नमूद केले.
यावेळी तानाजी पाटील, विजय यादव, शिवाजी डुम, प्रवीण गवळी, वसुंधरा चौगुले मकरंद चौगुले, प्रकाश मगदूम, नितीन संकपाळ, बजरंग चौगुले अनिल पंढरे, शिवगोंडा पाटील, हेमंत पाटील, अर्जुन इंगळे, सदाशिव चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान भारत संकल्प यात्रेचे नेर्ली ग्रामस्थांनी स्वागत करून, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.













































































