पाटगाव मध्यम येथील हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प इतर ठिकाणी उभा करा- प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अदानी प्रोजेक्ट इतर ठिकाणी उभा करा असे निवेदन देताना आमदार प्रकाश आबिटकर…

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कोल्हापूर – भुदरगड तालुक्याकरीता पाटगांव मध्यम प्रकल्पातील पाण्याचा प्रत्येक ठेंब अत्यंत महत्वपुर्ण आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील 115 हून अधिक गाव व वाड्यां-वस्त्यांवरील नागरीक व शेती अवलंबून असून पाटगाव मध्यम प्रकल्प येथे अदानी ग्रीन एनर्जी लिमीटेड कंपनी मार्फत उभारण्यात येणारा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प इतर ठिकाणी उभा करा अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, भुदरगड तालुक्यातील पाटगाव मध्यम प्रकल्पाचे पाणी भुदरगड तालुक्याकरिता जीवनदायी आहे. या प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्यातील सुमारे 12070 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. एकुण 105.242 दलघमी चे असणाऱ्या या धरणामधील 77 दलघमी एवढ्या पाण्याचा वापर केवळ सिंचनाकरिता होतो. बिगरसिंचनाकरिता 5.73 दलघमी एवढा पाणी वापर होतो. उर्वरित पाणी नदी खोऱ्यातील भविष्यकालीन योजनांसाठी आवश्यक आहे. तसेच पाटगाव प्रकल्पामध्ये मुळ नदी स्त्रोतातुन येणारे पाणी हे कमी असल्याने पाटगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणेकरिता खुप कालावधी लागतो. पाटगांव प्रकल्पावर भुदरगड तालुक्यातील नागरीकांच्या पिण्याचे व शेतीच्या पाण्यावर अवलंबून आहे.

 

प्रस्तावित पाटगाव प्रकल्पाकरिता अदानी ग्रीन एनर्जी लिमीटेड कंपनी मार्फ़त अंजिवडे ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग गावाजवळ नविन धरण बांधण्यात येणार असुन त्याधरणामध्ये तळंबा खो-यातील साठविलेले पाणी उचलुन पाटगाव मध्यम प्रकल्पामध्ये साठवण्यात येणार असुन त्याद्वारे वीजेची जास्त गरज असणा-या वेळेस त्याचा वापर करुन 2100 मेवट वीजनिर्मिती होणार असल्याचे समजते. या प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. यामुळे सदरचा प्रकल्प इतर ठिकाणी स्थलांतरीत करणे गरजेचे आहे. यामुळे पाटगाव मध्यम प्रकल्प येथे अदानी ग्रीन एनर्जी लिमीटेड कंपनी मार्फत उभारण्यात येणारा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प इतर ठिकाणी उभा करा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

सध्याचे सुरू असलेले राजकारण हे तुम्हाला प्रतिष्ठेचे व सत्याचे वाटते का?

View Results

Loading ...

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.