‘दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँक बचाव समिती’चे आमरण उपोषण तूर्तास स्थगित…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

प्रशासनाच्या विनंती वरुन बँक बचाव समिती’चे सोमवारपासून चे आमरण उपोषण तूर्तास स्थगित…

शिरपुर – दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप. बँक लि. शिरपुर, जि. धुळे या बँकेच्या चौकशी संदर्भातील सहा उपनिबंधक शिरपुर यांचेकडील कार्यालयीन पत्र जा क्रं. वि. १) मर्चंट बँक/ तक्रार अर्ज / सुनावणी सन 2023 अन्वये सुनावणी जाणीवपुर्वक टाळल्या बद्दल कंटाळून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे लेखी पत्र मा. सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था, शिरपुर, सहकार विभाग आणि जिल्हाधिकारींसह पोलिस प्रशासनाला ‘दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बचाव समिती’ ने दिलेले होते. पत्रात लिहिलेल्या मजकुरानुसार, वरील संदर्भीय विषयानुसार आज १४/१२/२०२३ रोजी तिस-यांदा सुनावणी ठेवलेली होती.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

यापूर्वी पहिल्यांदा ३०/११/२०२३ रोजीचीच सुनावणी झाली. त्यानंतर आपले कार्यालयीन पत्रानुसार ८/१२/२०२३ रोजीच्या दुसया व आज १४/१२/२०२३ चौकशी अधिकारी म्हणून कार्य पाहायासाठी स्वत: हजर राहायला पाहिजे होते.परंतु सुनावणीस लागोपाठ दुस-यांदा आपण चौकशी अधिकारी असतांना सुद्धा गैरहजर राहिले. तसेच ऐनवेळी आम्हांस दुसऱ्यांदा आपण स्वत: चौकशी अधिकारी असूनही सुनावणी स्थगित केल्याची माहिती आपले कनिष्ठ अधिकारी दुसाने यांनी दिली. याचाच स्पष्टपणे अर्थ असा दिसतो कि, अत्यंत नियमबाह्य व भ्रष्ट कारभार करणारे शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँकेचे अपात्र घोषित चेअरमन सह मॅनेजर, सर्व संचालक मंडळ, लोन ऑफिसर आणि संबंधित लोकांना संरक्षण देण्याचाच हा प्रकार आहे. सदरहू बँकेत मागील दोन महिन्यांपासून ठेवीदारांची भलीमोठी रांग लागलेली आहे. सुमारे एक महिन्यापासून चेक क्लियरिंग सुध्दा बंद आहे. सदरहू बँकेचे 2 एटीएम मशीन सुद्धा बंदच आहेत.म्हणजेच बँक डबघाईला आल्याचे एखादी सामान्य व्यक्ती पण सांगेल.परंतु या जिल्ह्यातील सहकार विभागाने डोळेझाक करून वेळ मारुन नेण्याचा एक कलमी कार्यक्रम राबविला आहे.

यामुळे सहकार विभाग आणि या विभागातील अधिका-यांविषयी संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले आहे. एवढे गंभीर आर्थिक घोटाळे स्पष्टपणे दिसत असूनही चौकशीच्या नावाखाली फक्त दिरंगाई होत आहे . म्हणजेच चौकशीचा नावाने निव्वळ फार्स सुरु आहे असे दिसते.यांस प्रामुख्याने जबाबदार असणारे चौकशीअंती अपात्र ठरलेले चेअरमन प्रसन्न जयराज जैन यांसह मॅनेजर , संचालक मंडळ, लोन ऑफिसर आणि सर्व जबाबदार लाभार्थींची तात्काळ चौकशी करून कठोर कार्रवाई करण्याचे सोडून हेतुपूर्वक वेळकाढूपणा केला जात आहे. हे तक्रारदार ‘बँक बचाव समिती’च्या निदर्शनांस आले आहे.

चौकशी अधिकारी प्रभारी सहाय्यक उपनिबंधक म्हणून आपण संजय गीते हे चौकशी करण्यास असमर्थ ठरले आहेत. म्हणून जिल्हा उपनिबंधकांनी ताबडतोब उद्या १५/१२/२०२३ रोजी सुनावणी होऊन आम्हांस न्याय द्यावा. सदरहू बँकेच्या सखोल चौकशीचे आदेश  सहकार आयुक्त  पुणे यांनी लेखी दिलेले असतांना सुध्दा जाणूनबुजून बुद्धिपुरस्कर या बँकेत कोट्यावधींचे आर्थिक गैरप्रकार करणा-यांना वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न होत आहेत. म्हणून तात्काळ उद्या १५/१२/२०२३ शुक्रवार रोजी सुनावणी ठेवून या बँकेच्या सर्व 14 संचालकांना अपात्र घोषित करून तक्रारदारांच्या इतर सर्व मुद्यांवर सुद्धा गांभीर्याने चौकशी करून लवकर कार्रवाई करावी ही नम्र विनंती. अन्यथा दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँक बचाव समितीचे आम्ही सर्व पदाधिकारी व सदस्य १८/१२/२०२३ सोमवारी सकाळी ११ वाजेपासून सहाय्यक उपनिबंधक, कार्यालय, शिरपुर, जि. धुळे समोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहोत.

यात होणा-या परिणामांस आणि आमच्या जीविताचे काहीही बरे-वाईट झाल्यांस दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँकेचे संबंधित सर्व अधिकारी, जबाबदार व्यक्ति आणि शासन-प्रशासन सर्वस्वीपणे जबाबदार राहतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. असा इशाराही या निवेदनाद्वारे बँक बचाव समिती ने दिलेला होता. त्या अनुषंगाने आज या बँक बचाव समिती चे पदाधिकारी गोपाल के. मारवाड़ी, मोहन साहेबराव पाटील, ओंकार आबा जाधव, हिरालाल रामराव कोळी, डॉ सरोजताई पाटील,भरत बाजीराव रोकडे हे सहा. उपनिबंधक शिरपुर यांचे कार्यालयासमोर उपोषणाला बसण्यासाठी कृउबा समिती परिसरात टेंट व्यवस्था करित असतांना विभागाचे अधिकारी व प्रशासनाने 2/3 दिवसात चौकशी अहवाल देतो, म्हणून विनंती केली व तसे लेखी पत्र बॅंक बचाव समिती ला दिले. तरी उपोषण तात्पुरते स्थगित केलेले आहे. याबद्दल सर्वानी नोंद घ्यावी! असे पत्रक दि मर्चंटस को-ऑप बॅंक बचाव समिती शिरपुर, जिल्हा धुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिले आहे.

 

आजच वेळ घ्या… त्रासमुक्त व्हा
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.