रेड्याची टक्करच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव यांच्याकडून ३० लाखांचा निधी मंजूर…
कोल्हापूर – कोल्हापूरचा आणि शाहूकालीन खेळांचा इतिहास जपला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. प्रतिभा नगर, सागरमाळ परिसरातील रेड्याची टक्कर चौकामधील रेड्याची टक्कर कामाच्या संवर्धन आणि कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. रेड्याची टक्कर ही भावी पिढीसाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वास यावेळी आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केला .
कोल्हापुरातील प्रतिभा नगर, सागरमाळ परिसरात ऐतिहासिक रेड्याची टक्कर आहे. या रेड्याची टक्करच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी १५ लाखांचा आणि आमदार जयश्री जाधव यांनी १५ लाखांचा, असा एकूण ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या संवर्धन आणि सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आज आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला सुरेश ढोणुक्षे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. यानंतर आमदार जयश्री जाधव आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते रेड्याची टक्करच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, रेड्याची टक्करच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले कोल्हापूरचा इतिहास आणि शाहूकालीन खेळांचा इतिहास जपला पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेच आहे, असे मत आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेड्याची टक्कर हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी, आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. ही रेड्याची टक्कर भावी पिढीला आदर्शवत ठरेल, असा विश्वास यावेळी बोलताना आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.
राजेंद्र पाटील यांनी आभार मानले. यावेळी काकासाहेब पाटील, प्रवीण चव्हाण, दत्ता पाटील, संदीप पाटील, स्वप्निल रजपूत, समीर कुलकर्णी, रामा पसारे ,सर्जेराव साळोखे, उमेश पोवार, दुर्गेश लिंग्रस, नितीन पाटील, रवी नलवडे, सुशील देसाई, राजू राऊत, कमलाकर जगदाळे, स्मिता सावंत – मांडरे, प्रेरणा बाकळे, कोल्हापूर शहरातील गवळी बांधव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.