डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात वर्किंग प्रोफेशनल्ससाठी पदवी अभ्यासक्रमास एआयसीटीईची मान्यता…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांची माहिती…

कसबा बावडा – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा या स्वायत्त अभियांत्रिक महाविद्यालयाला वर्ष 2023-24 पासून वर्किंग प्रोफेशनल्ससाठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नोकरी करत करत अभियंता बनण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या दोन शाखांसाठी प्रत्येकी 30 प्रवेश क्षमतेला मंजुरी मिळाली आहे. महाविद्यालयापासून 50 किलोमीटर पर्यंतच्या अंतरामध्ये असलेल्या केंद्र अथवा राज्य सरकारच्या संस्था त्याचबरोबर खाजगी किंवा सार्वजनिक संस्था यामध्ये कार्यरत कर्मचारी या पदवीसाठी प्रवेश घेऊ शकतात. किमान एक वर्ष पूर्ण वेळ काम करणाऱ्या आणि पदविका पूर्ण असलेल्या विद्यार्थ्याला पदवीसाठी प्रवेश घेता येईल, अशी माहीती आमदार पाटील यानी दिली.

या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायंकाळच्यावेळेत अथवा सुटी कालावधीत खास वर्ग घेतले जाणार आहेत तसेच 40% अभ्यासक्रम हा ऑनलाईन स्वरूपात विद्यार्थी करू शकतील. प्रवेश प्रक्रियेबाबत शासनाचे पुढील मार्गदर्शन प्राप्त झाल्यावर यासाठीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. तरी इच्छूक वर्किंग प्रोफेशनल्सनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ लीतेश मालदे आदी उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.