विनायक जितकर
राज्य आत्मा समितीचे सदस्य अशोकराव फराकटे यांचे बिद्रीचे चेअरमन के. पी. पाटील यांना आवाहन…
गारगोटी प्रतिनिधी – श्री दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि. बिद्री कारखान्याची पंचवार्षिक निवडूक जवळ आली असून या निवडूकीमध्ये कर्मचाऱ्यांना गाजर दाखवायचे म्हणून चेअरमन के.पी.पाटील यांनी 30% बोनस देण्याची घोषणा केली असून सदर बोनस एक रक्कमी देण्याचे आवाहन राज्य आत्मा समितीचे सदस्य अशोकराव फराकटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले.
![]() |
![]() |
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, बिद्री कारखान्यावर शासकीय प्रशासक कार्यरत असताना त्यांना कारखाना चालविण्याचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी ऊसाला टनास 305 रुपये अधिक दर दिला तसेच पुढील प्रकल्पासाठी 9 कोटी रुपये राखून ठेवले. तसेच प्रशासकांनी कर्मचाऱ्यांना 28% बोनस रोखीने देत 5 हजार रुपये सानुग्रह अनुदान देखील दिले होते. यासह 15% पगार वाढ देत ते देखील रोखीने दिले होते. गेली 5 वर्षामध्ये चेअरमन म्हणून के.पी.पाटील साहेब कार्यरत असताना त्यांनी 28% बोनस जाहिर केल्यानंतर पहिल्यांना 10%, 4 महिन्यानंतर 10% व नवीन सिजन सुरू होत असताना उर्वरित 8% बोनस तीन टप्यामध्ये देवून कर्मचाऱ्यांची थट्टा केली होती. तसेच गेली 2 वर्षामध्ये बोनस मधील 10% बोनसच्या 2 वर्षे मुदतीच्या पावत्या करून घेतल्या.
याचाच अर्थ चेअरमन के. पी. पाटील यांनी कर्मचाऱ्यांना एक रक्कमी बोनस कधीच दिला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे कधीत वेळेत मिळाले नाहीत. आता निवडणूकीच्या तोंडावर 30% बोनसची घोषणा केली सदरचा बोनस कर्मचाऱ्यांना एक रक्कमी दिल्यास कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार असून सदरचा बोनस एक रक्कमी द्या. यासह प्रशासकाने 15% पगार वाढ देवून ती एक रक्कमी दिली होती. परंतू के. पी. पाटील यांनी कर्मचाऱ्यांना 12% पगार वाढ देवून ती वर्षभराच्या पगारामध्ये दिली यामुळे या पगारवाढीचा फायदा कर्मचाऱ्यांना कधीच झाला नाही. तसेच या सिझनमध्ये 8 लाख 50 हजार इतके क्रशींग झाले असून निवडणूकी देखील तोंडावर आहे. यामुळे चेअरमन के. पी. पाटील यांनी 30% बोनस एक रकमी देवून कर्मचाऱ्यांना सानुग्रह बक्षीस देखील जाहीर करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.














































































