हळदी विभागप्रमुखपदी अरविंद सावरतकर यांची नियुक्ती, पॉझिटिव्ह वॉच युथ असोसिएशनची स्थापना

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

काेल्हापूरः कोल्हापूर येथील पॉझिटिव्ह वॉच युथ असोसिएशन या नव्याने स्थापन झालेल्या सामाजिक संस्थेवर कागल तालुका हळदी येथील अरविंद लक्ष्मण सावरतकर यांची विभाग प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.संस्थापक अध्यक्ष शेखर धोंगडे व उपाध्यक्ष अनिकेत बिराडे यांनी ही विशेष नेमणूक केली आहे.तसे ओळखपत्र व आयडी मुरगुड येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पूजा चंदनशिवे ( M.O (M.B.B.S) यांच्या हस्ते अरविंद सावरतकर यांना प्रदान करण्यात आले. यावेळी डॉक्टर पूजा चंदनशिवे यांनी अरविंद सावरतकर यांना आरोग्य विभाग तसेच ग्रामीण भागातील विविध समस्या तसेच आरोग्य यंत्रणा व सर्वसामान्य जनता यांच्यात समन्वय साधून शासनाचे उपक्रम व याेजना राबविण्यासाठी  सहकार्य करावे, असे असे सांगत शुभेच्छा दिल्या . यावेळी एक्सरे विभागाचे पाटील व आराेग्य विभागाचे सहकारी उपस्थित हाेते.

अरविंद सावरतकर यांनी मुरगूड तसेच हळदी परिसरामध्ये सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला आहे.  डाेंगरी भागातील नागरिकांना तत्काळ आराेग्य सुविधा मिळावी म्हणून त्यांनी आरोग्य दूत ची  याआधी महत्त्वाची जबाबदारी अनेकदा पार पाडली आहे. हळदी व पंचक्रोशी परिसरातील नागरिकांना  रुग्णवाहिका म्हणून स्वतच्या चारचाकी गाडीचा अनेकदा वापर करत,  रात्री अपरात्री रुग्णांना आरोग्य सेवा मिळवून देत, निपाणी, काेल्हापूर येथील मुख्य रुग्णालयात नेऊन कार्य तत्परता दाखवित, आराेग्य सेवा पार पाडली आहे.

रविंद सावरतकर यांनी ही पार पाडलेली आरोग्यदूची भूमिका पंचक्रोशी परिसरात नावलौकिकास प्राप्त ठरलेली आहे .यामुळेच या कामाची दखल घेत पॉझिटिव्ह वॉच युथ असोसिएशन तर्फे अरविंद सावरतकर यांची नेमणूक केली आहे. त्याचबरोबर आधुनिक युगात डिजिटल मीडियाला महत्व प्राप्त झाल्याने,  हळदी  तसेच मुरगुड सह पंचक्राेशी परिसरातील सकारात्मक बातम्या, माहिती,  शासकीय उपक्रम मिळावेत, त्यांना प्रसिद्धी मिळावी यासाठी  मुरगुड तेथून त्यांना  पत्रकार मित्र म्हणून कार्य करण्याची संधी देखील  देण्यात येत आहे. असे संस्थापक अध्यक्ष शेखर धाेंगडे यांनी सांगितले. ही सामाजिक संस्था, पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाजमित्र हे ब्रिदवाक्य घेऊन कार्य करत आहे, असे उपाध्यक्ष अनिकेत बिराडे म्हणाले. 

VHIDIO पाहण्यासाठी निळ्या लिंकला क्लिक करा..

https://youtu.be/h4fgx29myyo?si=4aUI5xgicN5BTIWF     

अरविंद सावरतकर विभागप्रमुख, पत्रकार मित्र

नियुक्ती झाल्यानंतर अरविंद सावरतकर यांनी ही जबाबदारी स्वीकारताना आपण प्रामाणिक व एकनिष्ठपणे कार्य करू .तसेच आरोग्य यंत्रणा पत्रकारिता यांचा सामाजिक कार्यासाठी उपयाेग करत, सर्वसामान्य जनता, शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय साधत सर्वसामान्य जनतेला सहकार्य करू, तसेच  जनतेला  पुन्हा आराेग्याची सेवा तसेच शासकीय उपक्रम राबविण्यासाठी पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएशन व पाँझिटीव्ह वाँच महाराष्ट्र मिडीयाच्या माध्यमातून काम करू असा विश्वास सावरतकर यांनी दिला. 

अधिकाधिक वाचली गेलेली बातमी.. तुम्ही वाचा..

मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करणारी.. ‘सारथी’ 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.