भ्रष्टाचा-यांना घाम फुटेल ऐवढे दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँकेचे गैरप्रकार ,अंतरिम ऑडिट अहवालात अनेक तथाकथित बडेजाव मिरवणा-यांची नांवे उघडकीस दोष दुरुस्ती अहवाल डीडीआर कडे दशकांपासून सादर केलेला नाही. आतापर्यंत सहकार विभाग आणि अंतरिम लेखापरीक्षक काय करत होते? लेखापरीक्षक सह सर्व दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी — तक्रारदार ‘मर्चंट बँक बचाव समिती’ चा सवाल आहे. धुळे (विशेष प्रतिनिधी):- जिल्यातील प्रमुख व्यापारीपेठ असलेल्या शिरपुर शहरातील 77 वर्षे जुनी शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँक सध्या 77% एनपीएसह गेल्या तीन वर्षांपासून खालचा दर्जा ‘क’ प्राप्त करत आहे आणि तिचा आर्थिक आलेख सतत घसरत आहे. याला जबाबदार असलेल्या चेअरमन आणि मॅनेजरचे गैरप्रकारांसंबंधी अनेक प्रकरणे जागृत सभासदांतर्फे पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणले आहेत. या संदर्भात अधिकृत तपशीलवार नांवानिशी यादीच या प्रतिनिधीकडे उपलब्ध आहे.अनेक गंभीर स्वरूपाची सर्व प्रकरणे समोर येतील. या बँकेसंबंधीचे तक्रारदार सभासद गोपाल के.मारवाडी, मोहन साहेबराव पाटील, ओंकार आबा जाधव, भरत बी.रोकडे ,हिरालाल कोळी सह जागृत सभासदांच्या तक्रारीवरून मा.सहकार आयुक्त, सहकारी संस्था, पुणे यांनी विद्यमान चेअरमन विरुद्ध त्वरीत चौकशी करून तात्काळ कार्रवाई करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. येत्या मंगळवारी सुनावणी येत्या आठवड्यात मंगळवार, 10 ऑक्टोबर रोजी जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांच्याकडे सुनावणी होणार आहे.
तसेच मागील दहा वर्षांत ज्या अंतरिम लेखापरीक्षकांनी (सीए नी) फक्त लेखापरीक्षण करुन दरवर्षीचे अत्यावश्यक दोष दुरुस्ती अहवाल बँकेकडून मागितले नाहीत. त्या सर्व सीए म्हणजे अंतरिम लेखापरीक्षक 1) श्री. राहुल पी.मुंदडा ,धुळे 2) श्री. जे.जे. अग्रवाल , धुळे 3) श्री. पवन आर. अग्रवाल, धुळे वगैरे सीए आणि कंपनीवरही सहकार विभागाने तातडीने गुन्हे दाखल करावे. यांनी आपल्या लेखापरीक्षणांत या लाभार्थ्यांची खोलवर चौकशी करून तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी का केली नाही.उलट ही अशी गंभीर स्वरूपाची प्रकरणे ज्या मध्ये कोणतेही तारण न घेता अशा असुरक्षित, पूर्णपणे बेकायदेशीर कर्ज वितरणाच्या लाभार्थ्यांची मोठी यादीच तयार होईल एवढी मोठी ही संख्या आहे.तिला अभय देण्यात यांचा काय हेतू होता? हे सर्वसामान्य सभासदांना चौकशी अंती कळलेच पाहिजे. बँकेच्या सर्वसाधारण सभासदांनी आता संपूर्ण भ्रष्टाचाराविरुद्ध दंड थोपटले असून सर्व माहिती उघड करण्याची मागणी केली आहे. किंबहुना हा या बँकेच्या सर्व सभासदांचा हक्कच आहे. लवकरच ही गैरप्रकार करणा-या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात अशी अनेक गंभीर स्वरूपाची प्रकरणे उजेडात येतील.म्हणून यांतील भ्रष्टाचा-यांना आधीच घाम फुटला आहे व झोप उडालेली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती पुराव्यानिशी लवकरच प्रकाशित करण्यात येईल.
या बातमी संदर्भातील हा विशेष लेख देखील खूप वाचला गेला.. तुम्हीही वाचा सविस्तर सहकार की स्वाहाकार?दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँकेतील गैरप्रकारांची मालिकाच उजेडात ?100 कोटींच्या ठेवींच्या जीवावर नियमबाह्य कर्ज वाटप |
CRIME- BANK FRAUD नावे उघडकीस…. भ्रष्टाचाऱ्यांना घाम फुटेल इतका बँकेत गैरप्रकार; लक्ष आयुक्तांच्या निर्णयाकडे! सावध; तुमच्याही परिसरात अशा बँका असू शकतात!
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.


















































































