शासकीय विभागाच्या समन्वयाने बँका अव्वल कामगिरी करतील – राजीवकुमार सिंग

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मागील आर्थिक वर्षात बँकांची उत्कृष्ट कामगिरी हातकणंगले तालुक्यातील बँकर्ससाठी कार्यशाळा संपन्न…

कोल्हापूर – जिल्ह्यात बँकेद्वारे विविध शासन पुरस्कृत योजना राबविल्या जात आहेत. मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सर्व बँकांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून या आर्थिक वर्षात देखील शासकीय विभागाच्या समन्वयाने बँका निश्चितपणे अव्वल कामगिरी करतील, असा विश्वास बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीवकुमार सिंग यांनी व्यक्त केला.

हातकणंगले तालुक्यातील बॅकर्ससाठी पहिली कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात पार पाडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक के दुर्गा सुनिता , आयडीबीआय बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक विक्रम भिडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक श्री. उपाध्ये, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रबंधक श्री. साखरे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी, हातकणंगले तालुक्यातील सर्व बँकाचे अधिकारी उपस्थित होते. के दुर्गा सुनिता म्हणाल्या, सर्व बँकांना विविध शासन पुरस्कृत योजनांची उद्दिष्टे दिले जातात. या कार्यशाळेचा सर्व बँकांना उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठी लाभ होईल. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक श्री. गोडसे यांनी सांगितले की सर्व बँकांना एका छताखाली सर्व शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. सर्व बँकांनी याचा लाभ घेऊन सर्व योजनांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची अव्वल कामगिरी कायम राखावी.

यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे विभाग, जिल्हा कृषी विभाग, भारतीय लघु उद्योग विकास बँक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या् जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ, ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, पशुसंवर्धन विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, रेशीम विभागाच्या अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती दिली व बँकर्सना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्याशी संवाद साधले आणि बँकर्सच्या शंकाचे निरसन केले. शासन पुरस्कृत सर्व योजना प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ संबधित सर्व घटकांना दिला जाईल, असे आश्वासन बँकर्सनी दिले.

आपल्या सेवेसाठी POSITIVVE WATCH MEDIA TEAM सज्ज

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.