माेफत मार्गदर्शनः-स्पर्धा परीक्षार्थींसाठी संधी… आजच नाव नाेंदवा; वेळ राखून ठेवा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मागील महिन्यापासून ‘स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन शिबिर’ घेण्यात येत आहे. मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी सुहास गाडे व भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती अन्नपूर्णा सिंग मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी व परीक्षार्थ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या मार्गदर्शन शिबिरात स्पर्धा परीक्षेची तयारी व याबाबत आवश्यक अन्य माहिती दर महिन्याच्या पाच तारखेला व्याख्यानातून  देण्यात येणार आहे.  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आव्हानेही वाढत आहेत. बदलत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी विद्यार्थी अपार कष्ट घेत आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, त्याचे महत्व समजावे, तसेच यातून महाविद्यालयीन विद्यार्थीही स्पर्धा परीक्षाकडे वळावे, याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

जिल्ह्यात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे शंभराहून अधिक अधिकारी आहेत. हे अधिकारी विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागातील संधी, त्यासाठी होणाऱ्या परीक्षा, आवश्यक पात्रता, यासाठीची तयारी आदींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यासह आपल्या अनुभवाद्वारे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा, अभ्यासाचे नियोजन कसे असावे, प्राथमिक तयारी करणाऱ्यांनी नेमकी सुरुवात कशापासून करावी आदी विविध पातळींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्यात विविध अधिकारी या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना माहिती देणार आहेत. या उपक्रमाचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा फायदा होईल, अशी माहिती करवीरचे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांनी दिली आहे.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.