सांगली जिल्हा परिषद आयोजित सन 2022-23 गुणवत्ता चाचणी शोध परीक्षा…
सांगली – सांगली जिल्हा परिषद आयोजित सन 2022-23 डॉ. पतंगराव गुणवत्ता चाचणी शोध परीक्षेत जिल्हा परिषद शाळा बेरडेवाडीतील दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत बसले. इयत्ता तिसरी चा विद्यार्थी वेदांत लक्ष्मण कंदारे यांने 93.33% गुण प्राप्त करून जिल्ह्यात 8 वा व शिराळा तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला . तर इयत्ता दुसरीचा विद्यार्थी सार्थक आनंदा कंदारे याने 94.33 गुण प्राप्त करून जिल्ह्यात चौथा व शिराळा तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावून उज्वल यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक जितेंद्र लोकरे, माजी मुख्याध्यापक सुप्रिया घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले.
![]() |
![]() |