कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर ( ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेत आज (दि. १९) दोन लाखावर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी दहा टन तांदूळ, चार टन गहू आणि चार न गुळ याच्यासह एकूण १८ टन धान्यांचा वापर करण्यात आला होता. या वर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात होणार हे ओळखून देवालय समितीने एकूण बारा काहिलीचा प्रसाद तयार केला होता. महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रसाद वाटपाचे नियोजन उत्तम रीतीने केल्यामुळे सर्वांना योग्य पद्धतीने प्रसादाचा लाभ घेता आला. उन्हाचा भक्तांना त्रास होऊ नये यासाठी भव्य मंडप घालण्यात आले होते. मंडपामध्ये प्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देवस्थान समिती, ग्रामपंचायत, प्रशासन, उत्सव समिती आणि ग्रामस्थ यांच्या शिस्तबद्ध नियोजनाबद्दल भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.
भक्तांना प्रसाद घरी देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा होती. संध्याकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद चालू होता. बिद्री साखर कारखाना, गोकुळ दुध संघ, स्वयंसेवी संस्था व भागातील ग्रामपंचायतींच्या पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. अध्यक्ष धैर्यशील भोसले, संदीप मगदूम, रावसाहेब कोणकेरी, शामराव होडगे, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, विजय गुरव, यशवंत पाटील, एस. पी. पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, संताजी भोसले, मारुती पाटील यांनी भेटी देऊन पाहणी केली.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.













































































