WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

संत सदगुरु बाळूमामा भंडारा यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

बाळूमामाच्या महाप्रसादासाठी १८ टन धान्य; दोन लाख भाविकांनी घेतला लाभ…

कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर ( ता. भुदरगड) येथील संत सदगुरु बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेत आज (दि. १९) दोन लाखावर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी दहा टन तांदूळ, चार टन गहू आणि चार न गुळ याच्यासह एकूण १८ टन धान्यांचा वापर करण्यात आला होता. या वर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात होणार हे ओळखून देवालय समितीने एकूण बारा काहिलीचा प्रसाद तयार केला होता. महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रसाद वाटपाचे नियोजन उत्तम रीतीने केल्यामुळे सर्वांना योग्य पद्धतीने प्रसादाचा लाभ घेता आला. उन्हाचा भक्तांना त्रास होऊ नये यासाठी भव्य मंडप घालण्यात आले होते. मंडपामध्ये प्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देवस्थान समिती, ग्रामपंचायत, प्रशासन, उत्सव समिती आणि ग्रामस्थ यांच्या शिस्तबद्ध नियोजनाबद्दल भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.

भक्तांना प्रसाद घरी देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा होती. संध्याकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद चालू होता. बिद्री साखर कारखाना, गोकुळ दुध संघ, स्वयंसेवी संस्था व भागातील ग्रामपंचायतींच्या पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. अध्यक्ष धैर्यशील भोसले, संदीप मगदूम, रावसाहेब कोणकेरी, शामराव होडगे, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, विजय गुरव, यशवंत पाटील, एस. पी. पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, संताजी भोसले, मारुती पाटील यांनी भेटी देऊन पाहणी केली.

चारशे स्वयंसेवकांनी बजावली सेवा

बाळूमामा देवालय समिती व ग्रामस्थ यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती, बेळगाव आदी जिल्ह्यातील सुमारे ४०० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सेवा बजावली. त्यामुळे यात्रेमध्ये शिस्तबद्ध नियोजन दिसून आले.

मोफत टू व्हीलर दुरुस्ती सेवा

यात्रा उत्सव काळात भाविकांच्या सेवेसाठी मोफत टू व्हिलर दुरुस्ती व पंक्चर मोफत काढून देण्याची सेवा करण्यात आली. मिनल ऑटोमोबईल व मुरगूड मेकॅनिकल टू व्हिलर असोसिएशन मुरगूड यांच्यातर्फे ही सेवा देण्यात आली. यासाठी दिपक माने, यशवंत भाट, अमोल पाटील, गोविंद मोरबाळे, संग्राम ढेरे, विनायक भोसले, अशोक मांगले, शरद पाटील, अमोल मांगले यांच्यासह अनेक दुरुस्त्या करणारे मेकॅनिक उपस्थित होते. ही सुविधा आदमापुरातील भक्तनिवास शेजारी करण्यात आली होती. नादुरूस्त दुचाकीस्वाराने संपर्क केल्यास आवश्यकतेनुसार जागेवर जाऊन गाडीची दुरुस्ती करून दिली आहे.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.